ETV Bharat / state

Devendra Fadnavis : भाजपाच्या हँडलवर मी पुन्हा येणार असा व्हिडिओ टाकणे शुद्ध वेडेपणा; देवेंद्र फडणवीस यांची सारवासारव - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी याआधी ही मी पुन्हा येईन असा नारा दिला होता. त्यानंतर या त्यांच्या नाऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. आत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात या विधानाची चर्चा होतेय. काल भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचा हा जुना व्हिडिओ शेअर (Devendra Fadnavis Video) करण्यात आला. त्यानंतर पुढच्या तासाभरात तो डिलीट करण्यात आला. त्यावर आता विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. तर यावर खुद्द देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी या विषयावर भाष्य करत पडदा टाकला आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 3:33 PM IST

Updated : Oct 28, 2023, 4:06 PM IST

प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस

मुंबई Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'मी पुन्हा येईन' हा व्हिडिओ शुक्रवारी भाजपा ट्विटर हँडल (एक्स) वर प्रकाशित करण्यात आला व थोड्याच अवधीत तो डिलीट केला गेला. यावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी या विषयावर भाष्य करत पडदा टाकला आहे. पुन्हा येणारे अशा पद्धतीचा व्हिडिओ टाकून येत नसतात, हा किती वेडेपणा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) त्यांचा कार्यकाळ संपूर्णपणे पूर्ण करतील. असं सांगत याप्रसंगी त्यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यांचाही समाचार (Devendra Fadnavis On Sharad Pawar) घेतला आहे. ते बोलत मुंबईत होते.

एकनाथ शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील : शुक्रवारी भाजपाच्या प्रदेश ट्विटर (एक्स) हँडलवरून देवेंद्र फडवणीस यांचा, 'मी पुन्हा येईन ' हा व्हिडिओ ट्विट (Punha Me Yein Video) केला गेला. त्यानंतर तो काही अवधीतच डिलीट केला गेला. या कारणाने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. या विषयावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला तर कधी कधी याबाबत आश्चर्य वाटतं, माझा पहिला प्रश्न असा आहे की, जर एखाद्याला पुन्हा यायचं असेल तर तो अशा पद्धतीने व्हिडिओ टाकून येतो का? हा किती वेडेपणा आहे. काहीतरी डोकं ठिकाणावर असलं पाहिजे. पण मी पुन्हा एकदा सांगतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा कार्यकाल पूर्ण करतील. त्यात एकही दिवस कमी होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रातील पुढील निवडणुका होतील. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत व एखादा व्हिडिओ असा पडला तसा पडला यावर इंटरप्रिटीशन करणं फार चुकीचं आहे.

पवार व फडणवीस यांच्यामध्ये हाच फरक : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल असं म्हटलं की, त्यांच्याकडे ११० आमदार आहेत म्हणून मी त्यांना नजरअंदाज करणार नाही. परंतु जर का माझ्याकडे ११० आमदार असते तर मी नवीन सरकार स्थापन केलं असतं. या विषयावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार व देवेंद्र फडवणीस यांच्यामध्ये हाच फरक आहे. देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहेत व ते एकनाथ शिंदे यांच्याच पाठीशी राहणार. एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत व त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास घडविण्याकरता मी पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी आहे.

पवारांचे वक्तव्य हास्यास्पद : आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांचा धसका घेतला आहे. या विषयावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांच्या नेतृत्वाखाली ३०५ खासदार निवडून येतात. त्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली ४ खासदार निवडून येतात त्यांचा धसका घेतला आहे, असं म्हणणं हास्यास्पद ठरेल. परंतु पवार साहेब नक्की काय म्हणाले. मी त्यांची पत्रकार परिषद ऐकलेली नाही म्हणून मी त्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation : मराठा आरक्षणाला विरोध करणारे देवेंद्र फडणवीसच आहेत का झारीतील शुक्राचार्य?
  2. Supriya Sule Criticized CM : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दसरा मेळाव्यातील भाषण काल्पनिक - सुप्रिया सुळे
  3. Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन; आम्ही 'मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी'

Last Updated : Oct 28, 2023, 4:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.