ETV Bharat / state

मराठवाड्यात अतिवृष्टी : देवेंद्र फडणवीस सोमवारपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर

author img

By

Published : Oct 18, 2020, 9:42 AM IST

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पाहणीसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 19 ऑक्टोबरपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान, ते शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहेत.

devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस

मुंबई - राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उद्या (सोमवारी) 19 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा दौरा करणार आहेत.

सोमवारी बारामतीपासून ते आपल्या दौऱ्याला प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी, 20 ऑक्टोबरला उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. यानंतर दिवशी 21 ऑक्टोबरला ते हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील.

दरम्यान, या तीन दिवसांत 9 जिल्ह्यांमध्ये सुमारे 850 कि.मी.चा प्रवास ते करणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.