मुंबई - एक वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार अजित पवार आपल्या समर्थकांसह सामील झाले व युतीची महायुती झाली. परंतु, या महायुतीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांची उचलबांगडी होणार असून, अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, या चर्चांना उधाण आले. यावर सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुलस्टॉप लावला. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहतील, ते बदलले जाणार नाहीत, असे ठामपणे सांगितले. तरीसुद्धा १६ अपात्र आमदारांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा अपात्र ठरतील व राज्यातील मुख्यमंत्री बदलले जातील, असा ठाम विश्वास विरोधकांना आहे.
एकनाथ शिंदे हे महायुतीचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे अजित पवार हे मुख्यमंत्री होणार या केवळ अफवा आहेत. सत्तेत येण्यापूर्वीच अजित पवार यांना सर्व गोष्टींची कल्पना दिलेली आहे - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
अजित पवार होणार मुख्यमंत्री? - राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या शिंदे-फडणवीस सरकारमधील समावेशाने राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलून गेली आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणात दिवसेंदिवस नवीन उलाढाली होताना दिसत आहेत. एकवेळ मी लग्न करायचा राहीन, परंतु अजित पवार यांच्याबरोबर जाणार नाही, असे काही वर्षांपूर्वी ठामपणे सांगणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे सत्तेत आल्यावर स्वागत केले.
लवकरच शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होणारच याचा ठाम विश्वास आहे - अनिल परब, आमदार, ठाकरे गट
16 आमदार अपात्र होतीलच - शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत २०१९ ला अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले. पण हे सरकार जेमतेम ८० तास टिकले. त्यानंतर सतत राज्याच्या राजकारणात ज्या काही राजकीय उलाढाली होत आहेत त्या सर्वांनाच परिचयाच्या आहेत. अशातच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत ४० आमदारांच्या समर्थकांसह भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिंदे गटाच्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आला आहे. या कारणास्तव आता अध्यक्षांना हा निर्णय घ्यावाच लागणार असून हे आमदार अपात्र ठरतील, असा ठाम विश्वास ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी व्यक्त केला आहे.
-
#WATCH | When asked about his reported statement "Ajit Pawar will become the next CM of Maharashtra", senior Congress leader Prithviraj Chavan says, "I can't reveal my sources. I talked about it a long time back, immediately after the split in NCP happened. It is just an analysis… pic.twitter.com/uyknIYQjrb
— ANI (@ANI) July 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | When asked about his reported statement "Ajit Pawar will become the next CM of Maharashtra", senior Congress leader Prithviraj Chavan says, "I can't reveal my sources. I talked about it a long time back, immediately after the split in NCP happened. It is just an analysis… pic.twitter.com/uyknIYQjrb
— ANI (@ANI) July 24, 2023#WATCH | When asked about his reported statement "Ajit Pawar will become the next CM of Maharashtra", senior Congress leader Prithviraj Chavan says, "I can't reveal my sources. I talked about it a long time back, immediately after the split in NCP happened. It is just an analysis… pic.twitter.com/uyknIYQjrb
— ANI (@ANI) July 24, 2023
१० ऑगस्टच्या आसपास एकनाथ शिंदे यांच्या अपात्रबाबतचा अंतिम निर्णय होईल व त्यानंतर मुख्यमंत्रीपदी अजित पवार हे विराजमान होतील - पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते
मोदींची भेट, शिंदे यांचा निरोप समारंभ? - काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत बोलताना असे सांगितले आहे की, येत्या १० ऑगस्टच्या आसपास एकनाथ शिंदे यांच्या अपात्रबाबतचा अंतिम निर्णय होईल व त्यानंतर मुख्यमंत्रीपदी अजित पवार हे विराजमान होतील. पृथ्वीराज चव्हाण यांच्या याच विधानाला काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अभिजीत वंजारी यांनी दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे अपात्र ठरतील आणि मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना विराजमान केले जाईल. कारण तशा पद्धतीचा शब्द त्यांना सत्तेत सामील करताना दिला आहे. एकनाथ शिंदे कुटुंबासोबत पंतप्रधान मोदी यांना भेटायला गेले होते. हा त्यांचा निरोप समारंभ तर नव्हता ना? असा प्रश्नही वंजारी यांनी उपस्थित केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. ती भेट म्हणजे निरोप समारंभ तर नाही ना?- अभिजीत वंजारी, आमदार, काँग्रेस
पुण्यात महत्त्वाची बैठक - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाहक मदनदास देवी यांचे सोमवारी पुण्यात निधन झाले होते. त्यानिमित्ताने भाजपचे वरिष्ठ नेते पुण्यामध्ये उपस्थित होते. सोमवारी पुण्याच्या जेडब्ल्यू मेरीट हॉटेलमध्ये एक महत्त्वाची अशी राजकीय बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा उपस्थित होते. यामध्ये नेमक्या कुठल्या विषयावर चर्चा झाली याबद्दल माहिती नसली तरीसुद्धा सध्याच्या परिस्थितीत १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा -