मुंबई: अशी लोक सावरकरांबद्दल बोलत आहेत, हे दुर्भाग्य आहे. तसेच त्यांना शिव्या शाप देत आहेत. त्यांना सांगावं लागतं तुम्ही सावरकर नाही, देशभक्तीवर पोसलेले राजकारणी आहात. तुमची कुठलीही ओळख नाही. राहुल गांधी म्हणाले आहेत की, मी माफी मागायला सावरकर नाही, अरे सावरकर होण्याची योग्यता काँग्रेसमध्ये नाही. त्यासाठी त्याग लागतो, तप लागतो. सावरकर होण्यासाठी मातृभूमीसाठी यातना भोगाव्या लागतात. अंदमान कोठडीत ११ वर्ष संडास जेवढी जागा असते त्यापेक्षा कमी जागेत राहावे लागते. तेव्हा खऱ्या अर्थाने सावरकर होता येते, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस विशेष करून राहुल गांधी यांना लगावला आहे.
स्वातंत्र्याची ज्योत तयार केली: पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही गांधीही नाही व सावरकर सुद्धा नाही. बंगालच्या एका खासदाराने सावरकरांच्या स्मरणार्थ प्रस्ताव आणला होता. ते तुमचे आजोबा फिरोज गांधी होते. हे तुम्ही विसरलात का? इतिहासाशी तुमचा संबंध नाही. तुम्ही सावरकर कधीच होऊ शकत नाही व गांधीही होऊ शकत नाही. सावरकरांनी कोवळ्या वयात स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरू केली. छोट्या छोट्या तरुणांना एकत्र करून स्वातंत्र्याची ज्योत तयार केली. हे व्रत शेवटपर्यंत त्यांनी पाळले. सावरकरांनी लंडन हाऊस मध्ये स्वातंत्र्याची ज्योत तयार केली. इंडिया हाऊस मध्ये राहत असताना बॉम्ब कसा बनवायचा, पिस्तूल कसं हातालायचं हे काम त्यांनी केलं. सावरकरांनी लिहिलेल्या पुस्तकांनी युवकांच्या मनात स्वातंत्र्याची क्रांती निर्माण केली. भगतसिंग यांनी त्याची दुसरी आवृत्ती छापली नेताजी सुभाष चंद्र बोस सांगायचे सावरकरांचे पुस्तक वाचा. इंग्रजांनी सर्वात जास्त पैसा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मागे खर्च केला, हे काँग्रेस विसरले आहे. मातृभूमीची आराधना त्यांनी केली. स्वातंत्र्य सैनिकांना स्फुरण त्यांनी दिले.
शिवाजी महाराजांची आरती सावरकरांनी लिहिली : सावरकरांनी जहाजातून उडी मारून ते फ्रान्सला पोहोचले. तेव्हा इंग्रजांनी पुन्हा त्यांना त्याब्यात घेतले व भारतात खटला चालवला सावरकर असे एक व्यक्ती आहेत ज्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यावर सुद्धा सावरकर हसले होते. ज्या ख्रिश्चन धर्मामध्ये दोन जन्मावर विश्वास ठेवला जात नाही, त्यांनी सावरकरांवर विश्वास केला, ही आश्चर्याची गोष्ट असल्याचही फडवणीस म्हणाले. अंदमानच्या जेलमध्ये काळ्यापाण्याची शिक्षा त्यांना झाली जिथून कोणी परत येत नाही, तिथून ते परत आले. हा माणूस रोज मेला पाहिजे अशा पद्धतीच्या यातना त्यांना अंदमानच्या कोठडीमध्ये देण्यात आल्या. कोलूला जूपून तेल काढण्याचं काम सावरकरांना दिल गेलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेसला नेहमीच भीती राहिली आहे. दुसरे सुभाषचंद्र बोस असे नेते होते ज्यांना काँग्रेसने कधी जागा दिली नाही. काळ्या पाण्याची शिक्षा भोगत सावरकर जेलमध्ये राहिले. सावरकर हे स्वातंत्र्यवीर नाही तर विज्ञाननिष्ठ हिंदुत्ववादी होते, असेही फडवणीस यांनी सांगितल आहे. सावरकरांनी कधीच अंधश्रद्धेला थारा दिला नाही. त्यांना अस्पृश्यता मान्य नव्हती. मंदिर उघडण्याचं काम सावरकरांनी केलं. जाती प्रथा कधी मानली नाही. माय मराठीला खऱ्या अर्थाने सावरकरांनी समृद्ध केले. महापौर, विधानमंडळ असे शब्द सावरकरांनी दिले आहेत. शिवाजी महाराजांची आरती सावरकर यांनी लिहिली आहे. ते आज सावरकरांचा अपमान करत आहेत. उद्धव ठाकरे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, असा टोलाही देवेंद्र फडवणीस यांनी लगावला आहे.