मुंबई Devendra Fadnavis On Congress : काँग्रेसच्या 139 व्या वर्धापन दिनानिमित्त नागपूरमध्ये महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र ही महारॅली नाही तर सूक्ष्म रॅली होती अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईत बोलताना केली. राहुल गांधी यांचे भाषण सुरू असतानाच लोक मैदानातून जात होते. अर्ध्याहून अधिक मैदान आधीच रिकामे होते. मैदान भरण्यासाठी तेलंगणामधून लोक आणले होते. मात्र तरीही मैदान भरू शकले नाही ही अत्यंत सूक्ष्म रॅली होती. या रॅलीचं नाव त्यांनी 'है तयार हम' असं म्हटलं होतं. मात्र, जनतेने आम्ही तयार नाही असंच दाखवून दिलं आहे. जर जनताच राहुल गांधी यांना गांभीर्याने घेत नसेल तर त्यांच्या विषयावर आपणही गांभीर्याने बोलण्याची गरज नाही असंही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर : यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या स्पर्धेत असलेली राज्ये आता मागे पडलेली आहेत. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र दुसऱ्या तिमाहीमध्ये सुद्धा पहिल्याच क्रमांकावर आला आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये 28 हजार 868 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याची माहिती, फडणवीस यांनी दिलीय.
त्यामुळं महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर : 2022-23 या आर्थिक वर्षात एक लाख 18 हजार 422 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. त्यामुळं महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत 36 हजार 634 कोटी रुपये परकीय गुंतवणूक राज्यात आली होती. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीचा विचार केला तर एकूण 65 हजार पाचशे दोन कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली. ती जवळजवळ कर्नाटक दिल्ली आणि गुजरात या तीन राज्यातील एकत्रित गुंतवणुकी इतकी असल्याचा दावा. फडणवीस यांनी केला. म्हणजेच एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2023 असा एकत्रित विचार केल्यास राज्यात एक लाख 83 हजार 924 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली आहे.
अटल सेतूचे लवकरच उद्घाटन : यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, मुंबई शिवडी ते न्हावा शेवा हा हार्बर सिलिक प्रकल्प आता पूर्ण झालाय. त्याचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन लवकरच होणार आहे. या मार्गाला अटल सेतू हे नाव देण्यात आलं आहे. उद्घाटनाची तारीख ही जवळपास निश्चित झाल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा -