मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोनाबाबत प्रतिक्रिया देण्याआधी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबाबत बोलावे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आज (सोमवारी) सुरुवात झाली. ते विधीमंडळ प्रांगणात माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राज्यसरकारवर जोरदार टीका केली.
...आणि म्हणे ही आपत्कालीन परिस्थिती -
इथे आंदोलकांना त्यांच्या घरामध्ये जाऊन हाणामारी केली जात आहे. मात्र, राज्य सरकार दिल्लीतील आंदोलकांबाबत प्रतिक्रिया देत आहे आणि ही आपत्कालीन परिस्थिती असल्याचं म्हणत आहे, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अघोषिथ आणीबाणी असल्याची जोरदार टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, महाराष्ट्रात जर अषोघित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? दिल्लीत भर थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले जात आहेत. त्यांना देशद्रोही म्हटले जात आहे. ही काय सद्भावनेची गोष्ट आहे का? असा प्रश्नही मुख्यमंत्री ठाकरेंनी फडणवीसांना केला होता.
फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर...हेही वाचा - 'शक्ती विधेयक पटलावर ठेवलय, उद्या चर्चा होईल आणि मंजूर होईल'
कामगार, शेतकऱ्यांच्या न्याय हक्काबाबत कोणी बोलले तर ते देशद्रोही. विरोधात बोलले आणि तुरुंगात टाकणे ही आणिबाणी नाही का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विरोधी नेत्यांना विचारला. महाराष्ट्रातील नेत्यांनी कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी किती चांगला हे दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जाऊन सांगावे. येथे का बोलत आहेत, असे देखील ठाकरे म्हणाले होते.