ETV Bharat / state

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? फडणवीसांचा सेनेवर हल्लाबोल

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ भाजपने एका रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, या रॅलीला सरकारने परवानगी नाकारल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले.

Devendra Fadnavis comment on shivsena
फडणवीसांचा सेनेवर निशाणा
author img

By

Published : Dec 27, 2019, 6:32 PM IST

Updated : Dec 27, 2019, 8:07 PM IST

मुंबई - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ भाजपने एका रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, या रॅलीला सरकारने परवानगी नाकारल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले. 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का,' असा सवाल यावेळी त्यांनी केला. खुर्चीसाठी काही लोक सावरकरांचा अपमान सहन करत असून, त्यांच्या तोंडावर कुलूप लागल्याचे म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

ऑगस्ट क्रांती मैदानावर आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी काँग्रेससह शिवसेनेवर निशाणा साधला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याने कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही. खुर्चीसाठी काही लोक अराजकता वाढवत असल्याचे फडणवीस म्हणाले. काही लोकांना खुर्चीची हाव सुटली आहे. हिंदूंनी कोणावर कधीही आक्रमण केले नाही. मात्र, आक्रमण करणाऱ्यांना सोडणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. आमची लढाई आग लावणाऱ्यांच्या विरोधात सुरु झाली आहे. या देशाला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीसांचा सेनेवर हल्लाबोल

CAA चे समर्थन करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही

तुम्ही आम्हाला मोर्चा काढण्यापासून रोखू शकता, आम्हाला परवानग्या नाकारू शकता मात्र, CAA चं समर्थन करण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आम्ही शांतपणे लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याची परवानगी मागितली होती. ती परवानगीही आम्हाला नाकारण्यात आली. लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याची संमती हे सरकार नाकारत असेल तर मला टिळकांनी जो प्रश्न विचारला तो विचारावाच लागेल की, या 'सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?' असेही फडणवीस म्हणाले.

पाकिस्तान, बांगलादेश यामध्ये हिंदूंवर अत्याचार झाले ते या संकुचित लोकांना दिसत नाही का? असाही सवाल फडणवीसांनी केला. 'सत्ता येईल-जाईल, मात्र ये देश रहना चाहिये.
देशाच्या सुरक्षेसाठी खुर्चीवर लाथ मारु', असेही फडणवीस म्हणाले. सत्तेत आल्यानंतर शिवसेनेची भूमिका बदलली असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.

Intro:Body:

मुंबई -  नागरिकत्व दुरुस्ती  कायद्याच्या समर्थनार्थ भाजपने एका रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, या रॅलीला सरकारने परवानगी नाकारल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल यावेळी त्यांनी केला.  मात्र, खुर्चीसाठी काही लोक सावरकरांचा अपमान सहन करत असून, त्यांच्या तोंडावर कुलूप लागल्याचे म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

ऑगस्ट क्रांती मैदानावर आयोजीत सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी काँग्रेससह शिवसेनेवर निशाणा साधला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याने कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही. खुर्चीसाठी काही लोक अराजकता वाढवत असल्याचे फडणवीस म्हणाले. खुर्चीसाठी काही लोक लालची झाले आहेत. हिंदूंनी कोणावर कधीही आक्रमण केले नाही. मात्र, आक्रमण करणारांना सोडणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.आमची लढाई आग लावणाऱ्यांच्या विरोधात सुरु झाली आहे. या देशाला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले.

Conclusion:
Last Updated : Dec 27, 2019, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.