मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज पार पडला. हा सोहळा झाल्यानंतर काहीच वेळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारवर टीका केली आहे. या सरकारने वारेमाप घोषणा केल्या असल्या तरी त्यांच्या किमान समान कार्यक्रमात विकासात मागे राहिलेल्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या क्षेत्राचा नामोल्लेख नाही. हे दुर्दैव असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
-
महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या!
">महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 28, 2019
नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या!महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 28, 2019
नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या!
महाविकास आघाडीने आज त्यांचा किमान समान कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये त्यांनी शेती, आरोग्य, रोजगार यासंदर्भात काही घोषणा केल्या आहेत. मात्र, यामध्ये विकासात मागे राहिलेल्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या क्षेत्रासाठी काहीच जाहीर केले नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या! असे फडवीस यांनी ट्वीट केले आहे.