मुंबई - भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्य नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावर आभार मानत देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. यात ते शोले चित्रपटातील दाखला देत अमिताभ बच्चनची आठवण करून देतात. ज्याप्रमाणे बच्चन नवऱ्या मुलाचे कौतुक करतो, त्याप्रमाणे काहींनी माझ्या अभिनंदनपर भाषणात माझे कौतुक केले असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्य नेत्यांची भाषणे झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चु कडू, बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी अभिनंदन पर भाषण केले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आणि सर्व आमदारांचे मी आभार मानतो. काल (शनिवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मी आभार माननार होतो, त्या दुर्दैवी कारणामुळे मला देता आल्या नाही. मात्र, आज विरोधी पक्ष नेता म्हणून मन:पूर्वक आभार मानतो.
कालच्या प्रसंगावर -
हंगामी विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा अंतीम असल्यामुळे आम्ही तो मानला. त्यांच्या निर्णयावर आम्ही समाधानी नसल्यामुळे सभागृहातून बहिर्गमन केले.
शपथे अगोदर अभिवादन करण्यावरून याबद्दल फडणवीस काय म्हणाले -
मी सभागृहात संविधान आणि विधानसभा कामकाज करण्याच्या पुस्तकाव्यतिरिक्त काहीही बोलणार नाही. त्यामुळे शपथेच्या आराखड्याबद्दल आम्हाल बोलण्याचा अधीकार आहे. जयंत पाटील यांनी काल आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नाचा विपर्यास केला. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे, त्यांचेच नाव घेऊन आम्हाल यश मिळाले. तसेच भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले यांचे नाव घेण्याबद्दल आमचे काही म्हणणे नाही. मात्र, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिले, त्यातील मुद्दे उचलून धरणे चुकीचे वाटत नाही.
'पुन्हा येईन' फडणवीस यांचा आशावाद -
मी पुन्हा येईन म्हणालो होतो पण वेळेची मर्यादा घातली नव्हती. त्यामुळे प्रतिक्षा करा. पुन्हा आला तर मी तुमच्यासकट येईल असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला. जयंतराव आम्ही सुरू केलेल्या सर्व प्रकल्पाचे कदाचीत उद्घाटनही करू असा चिमटा फडणवीस यांनी जयंत पाटील यांना उद्देशून काढला. तसेच 'मेरा पाणी उतरता देख, मेरे किनारे पे घर मत बसा लेना, मै समंदर हुँ लौटकर आऊँगा.'