ETV Bharat / state

युपीएचा अध्यक्ष बदला असं टीममधील १६वा गडी बोलत आहे, देवेंद्र फडणवीसांचा टोला - UPA president

आमदार चषकाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. ते खेळाडूंसोबत मैदानात क्रिकेट खेळले.

devendra fadanvis criticized  MVA, UPA president
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Mar 25, 2021, 3:02 PM IST

मुंबई - आमदार कालिदास कोळंबकर यांच्या तर्फे आमदार चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या आमदार चषकाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. ते खेळाडूंसोबत मैदानात क्रिकेट खेळले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, की मला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड आहे. मला लूज बॉल भेटला तर मी तो ग्राऊंडच्या बाहेर पाठवतो आणि आत्ता तसे लूज बॉल मला भरपूर भेटत आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारवर टीका..
प्रकरण उघडकीस आणणांऱ्यावर कारवाई -हे सरकार रश्मी शुक्ला यांची चौकशी करणार आहे. यावर फडणवीस म्हणाले की ज्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले त्यांचीच चौकशी सरकारकडून केली जाते. पण ज्यांनी हे प्रकरण केले त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची चौकशी होत नसून ते अजून मोकाट फिरत आहेत. त्यामुळे एका महिला अधिकार्‍यांच्या संदर्भात या सरकारची भूमिका नक्की नेमकी काय आहे, हे आपल्याला दिसत आहे. ज्या मंत्र्यांनी रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात हे वक्तव्य केले आहे, एका महिलेबद्दल आपण काय बोलत आहोत, याचा विचार करायला हवा.

युपीएचा अध्यक्ष बदला, अशी मागणी १६वा गडी करतोय -

युपीएचा अध्यक्ष बदलावा, अशी मागणी १६ वा गडी करतोय. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला.

हेही वाचा - वाझे-हिरेन भेटीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर; हत्याकांडसंदर्भात समोर आले मोठे खुलासे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.