ETV Bharat / state

जाणून घ्या, काय आहे सायकॉलॉजीकल अटोप्सी? - Psychological Autopsy latest News

बहुतांशी केसेसमध्ये सायकॉलॉजीकल अटोप्सीची गरज भासत नाही. त्यासाठी केवळ मेडिकल अटोप्सीही पुरेशी असते. मात्र, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हा आत्महत्या आहे, हत्या आहे की, अपघात आहे हे स्पष्ट होत नसल्यास सायकॉलॉजीकल अटोप्सीचा वापर करण्यात येतो

Psychological Autopsy
सायकॉलॉजीकल अटोप्सी
author img

By

Published : Aug 25, 2020, 3:44 PM IST

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. सुशांतने आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली? याचा तपास आता सीबीआय करत आहे. यासाठी सीबीआयच्या पथकाने सुशांतच्या संदर्भात सायकॉलॉजीकल अटोप्सी करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून सुशांतच्या मृत्यूसाठी कुठल्या गोष्टी जबाबदार आहेत? याचा शोध घेतला जाणार आहे.

काय आहे सायकॉलॉजीकल अटोप्सी

काय आहे सायकॉलॉजीकल अटोप्सी?

बहुतांशी केसेसमध्ये सायकॉलॉजीकल अटोप्सीची गरज भासत नाही. त्यासाठी केवळ मेडिकल अटोप्सीही पुरेशी असते. मात्र, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हा आत्महत्या आहे, हत्या आहे की, अपघात आहे हे स्पष्ट होत नसल्यास सायकॉलॉजीकल अटोप्सीचा वापर करण्यात येतो. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू आगोदार त्याची मेडिकल हिस्ट्री किंवा मानसिक ताणतणाव असेल तरीही सायकॉलॉजीकल अटोप्सी केली जाते. सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये आत्महत्या, हत्या व अपघात या तिन्ही गोष्टींची शक्यता असल्याने त्याबाबत स्पष्टता मिळवण्यासाठी सीबीआयने सायकॉलॉजीकल अटोप्सी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय योग्य असल्याचे मत मानसोपचार तज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी व्यक्त केले.

काय होते सायकॉलॉजीकल अटोप्सीत?

यात संबंधित व्यक्तीने त्याच्या संदर्भात एखादी डायरी मेंटेन केली आहे का? हे तपासले जाते. पीडित व्यक्तीने त्याच्या मानसिक तणावाबद्दल समाज माध्यमावर काही लिहिले आहे का? त्याच्या जवळच्या व्यक्तींकडे त्याच्या एकलकोंडेपणाबद्दल तो व्यक्त झाला होता का? याची चौकशी केली जाते. व्यक्तीच्या मानसिक उपचारांची कागदपत्रे तपासून त्याची मानसिक वर्तणूक कशी होती, त्याचे खाणे, पिणे, झोप या सगळ्यांची माहिती घेऊन अभ्यास केला जातो व त्यातून तज्ञ एका मतावर येतात.

सायकॉलॉजीकल अटोप्सीच्या फक्त तपासासाठी पुरक -

सायकॉलॉजीकल अटोप्सी हा कुठल्याही तपासात पुरावा म्हणून ग्राह्य धरली जात नाही. याचे कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू संदर्भातील कारण शोधण्यासाठी तपासादरम्यान पूरक अशी ही पद्धत आहे. मात्र, सायकॉलॉजीकल अटोप्सीच्या माध्यमातून पीडित व्यक्तीची हत्या, आत्महत्या किंवा अपघाती मृत्यू झाला ठामपणे सांगणे कठीण असते, असे मत डॉ. सागर मुंदडा यांनी व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.