ETV Bharat / state

Fadnavis Appeals Mauritian Entrepreneurs: 'ही' आहेत महाराष्ट्राची बलस्थाने, तर करा गुंतवणूक; देवेंद्र फडणवीस

'इंडो-मॉरिशस बिझनेस फोरम'च्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॉरिशसमधील उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गजांना महाराष्ट्राची बलस्थाने सांगत त्यांना राज्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यात गुंतवणुकीसाठी एक व्यासपीठ स्थापन करण्यात येणार असून यासाठी 'इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बोर्ड', मॉरिशस (ईडीबी) आणि 'एमआयडीसी' यांच्यात आज (शुक्रवारी) एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

Fadnavis Appeals Mauritian Entrepreneurs
फडणवीस
author img

By

Published : Apr 28, 2023, 10:21 PM IST

मुंबई: महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यात गुंतवणुकीसाठी सहकार्य वाढविणे, व्यापाराला प्रोत्साहन देणे, यासाठी यंत्रणा विकसित करणे, संस्थागत संबंध वाढविणे, क्षमता निर्माणाचे कार्य करणे आणि आर्थिक संबंधांना चालना देणे हे उद्देश या सामंजस्य करारातून साध्य केले जाणार आहेत. मॉरिशसचे अर्थमंत्री डॉ. रेनगॅनाडेन पदयाची, परराष्ट्र व्यवहार मंत्री ॲलन गानू, माहिती-तंत्रज्ञान मंत्री दीपक बालगोबिन, भारताच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला तसेच मॉरिशसमधील उद्योजक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आजचा दिवस हा महाराष्ट्र-मॉरिशस यांच्या मैत्री संबंधातील ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगितले.

औद्योगिक उत्पादनात वाटा २० टक्के: महाराष्ट्र हे भारतातील एक अग्रेसर राज्य आहे. भारताच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा २५ टक्के आहे. देशात येणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी २८ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येते तर औद्योगिक उत्पादनात वाटा २० टक्के आहे. कोविड काळाचा अपवाद सोडला तर महाराष्ट्राचा 'सीएजीआर' (कंपाऊंड ॲन्यूअल ग्रोथ रेट) हा सातत्याने १० टक्के आहे. सर्वाधिक विद्यापीठे, वीजनिर्मिती आणि वीजवापर महाराष्ट्रात असून राज्याची डेटा क्षमता ६५ टक्के आहे. महाराष्ट्र ही देशाची 'स्टार्टअप राजधानी' असून ८० हजार पैकी १५ हजार 'स्टार्ट अप' आणि १०० पैकी २५ युनिफॉर्न हे येथेच आहेत. महाराष्ट्र हे देशाची व्याघ्र राजधानीसुद्धा आहे आणि ७०० किमीचा समुद्र किनारा राज्याला लाभला आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.

महाराष्ट्र-मॉरिशस विकासाचा मानबिंदू: राज्य सरकार 'इज ऑफ डूइंग बिझनेस' आणि 'कॉस्ट ऑफ डूइंग बिझनेस' यावर सातत्याने काम करत आहे. आज जो सामंजस्य करार करण्यात आला, त्यामुळे मॉरिशसमधील उद्योजकांना एक मोठे दालन खुले होणार आहे. 'स्पीड ऑफ ट्रॅव्हल' आणि 'स्पीड ऑफ डेटा' ही महाराष्ट्राची वैशिष्ट्ये आहेत. राज्यात एकाहून एक पायाभूत सुविधांची निर्मिती सुरू आहे आणि दुसरीकडे फायबरच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत इंटरनेट पोहोचविले जात आहे. आता त्याला '5-जी' तंत्रज्ञानाची जोड प्राप्त होईल. आजचा करार हा महाराष्ट्र-मॉरिशस विकासाचा मानबिंदू ठरेल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अर्थव्यवस्थेचा वेग कायम राखला: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायम राज्यांशी आणि इतर देशांशी संबंध अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी आग्रही असतात. भारत हा राज्यांमध्ये वास्तव्य करतो, हीच त्यामागची त्यांची भावना आहे. आज 'जी-20' चे अध्यक्षपद भारताकडे आहे. 'एक पृथ्वी-एक कुटुंब-एक भविष्य' हीच 'वसुधैव कुटुंबकम्'ची भावना घेऊन त्यांच्या नेतृत्वात भारत पुढे चालला आहे. कोरोनाच्या काळात आणि त्यानंतरसुद्धा भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग कायम राखला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी नमूद केले.

हेही वाचा: Abdul Sattar On Panchanama : नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनाम्यावर कॅबिनेटमध्ये निर्णय होईल - कृषिमंत्री अब्दुल सत्तार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.