ETV Bharat / state

केंद्र सरकारने महागाई कमी करून दिलासा द्यावा - उपमुख्यमंत्री - मुंबई जिल्हा बातमी

राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या आणि घरगुती गॅसच्या किंमतीवर भाष्य केले. वाढती महागाई केंद्र सरकारने कमी करून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्ती केली. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नावर आणि टीकेवर उपमुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली.

ajit pawar
अजित पवार
author img

By

Published : Mar 4, 2021, 5:55 PM IST

मुंबई - महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात नागरिकांना सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या, कोविड सेंटरची निर्मिती केली. चांगले काम करूनही विरोधक सरकारवर चिखलफेक करतात, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल अभिभाषणावर बोलताना व्यक्त केली. तसेच राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या आणि घरगुती गॅसच्या किंमतीवर भाष्य केले. वाढती महागाई केंद्र सरकारने कमी करून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्ती केली. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नावर आणि टीकेवर उपमुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली.

पुरावे द्या कारवाई करू

कोरोना काळात टाळेबंदी झाल्यावर जनतेत भीतीचे वातावरण पसरले होते. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला व त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी राज्यात सर्व जिल्ह्यात आणि मुंबईत कोविड सेंटर निर्माण करण्यात आले. खासगी रुग्णालयेही ताब्यात घेतली. मोठ्या प्रमाणात आरोग्यव्यवस्थेची निर्मिती केली. असे करुनही संकट काळाता विरोधकांकडून संशयाच्या नजरेने पाहण्यात आले. उपाययोजना करताना भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सुरू आहे. पण, विरोधकांनी भ्रष्टाचार झाला असेल तर त्याचा पुरावा द्या, पुरावा दिल्यावर संबंधितावर तत्काळ कारवाई करू, असे स्पष्ट केले. या काळात अत्यंत वेगाने आणि कठोर निर्णय घेणे भाग पडले त्यामुळे त्या काळात काही अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या राजकारणामुळे त्या बदल्या झाल्या नसल्याचे सांगत विरोधकांचे आरोप उपमुख्यमंत्री पवार यांनी खोडून काढले.

महागाईला आळा घालून केंद्राने सर्वसामान्यांना दिलासा द्यावा

काँग्रेसचे सरकार असाताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव प्रती बॅरल 100 रुपयांपेक्षा जास्त असताना राज्यात पेट्रोल-डिझेलचे भाव 70 रुपयांच्या आसपास होते. पण, आता जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव प्रती बॅरल 60 रुपयांपेक्षा कमी आहेत. तरी देशात इंधनाचे भाव 100 रुपये लिटरवर पोहोचले आहे. राज्यात आकारण्यात येणाऱ्या इंधनातील निम्म्यापेक्षा जास्त रुपये केंद्राकडे जातात. केंद्राच्या करामुळे राज्यातील पेट्रोल-डिझेलचे भाव जास्त असल्याचे पवार म्हणाले. तसेच घरगुती गॅसच्या करात वाढ केल्याने देखील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे वाढत्या महागाईला आळा घालून सर्व सामान्य नागरिकांना केंद्राने दिलासा द्यावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचे भाषण ओवैसीच्या विषारी झाडाला खतपाणी घालणारे - संजय निरुपम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.