ETV Bharat / state

उत्पादन शुल्क विभागाकडून अनधिकृत मद्यविक्रीवर कारवाई, ३ कोटी ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त - production

राज्यात मद्यविक्रीचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. निवडणुकीचा हंगाम लक्षात घेता, कारवाईसाठी राज्यांच्या सीमांवर ४० तपास नाके तयार करण्यात आले आहेत. राज्यातील सर्व देशी व विदेशी मद्य निर्मिती कारखान्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे.

राज्य उत्पादन शुल्क अनधिकृत मद्यविक्रीवर कारवाई करत आहे
author img

By

Published : Apr 1, 2019, 12:18 PM IST

मुंबई - निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी मद्य वाटले जाते. त्यामुळे अनधिकृत मद्यविक्रीही मोठ्या प्रमाणात होते. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत ३ कोटी ७१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तरीही ही कारवाई संथ गतीने चालू असल्याचे सांगितले जात आहे.

उत्पादन शुल्क विभागाकडून केली जाणारी कारवाई योग्य असल्याचे मद्य विक्रेत्यांचा मत आहे

राज्यात मद्यविक्रीचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. निवडणुकीचा हंगाम लक्षात घेता, कारवाईसाठी राज्यांच्या सीमांवर ४० तपास नाके तयार करण्यात आले आहेत. राज्यातील सर्व देशी व विदेशी मद्य निर्मिती कारखान्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. ११ मार्च ते २५ मार्च या कालावधीत तब्बल २२११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात अनधिकृत हातभट्ट्या, रसायन, ताडी, देशी मद्य, विदेशी मद्याचा समावेश आहे.

विविध ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत अनधिकृत मद्याची आयात निर्यात करणाऱ्या १०० गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. यात दोन दुचाकी, तीन चारचाकी वाहनांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्याच्या सीमांना लागून असलेल्या इतर राज्यात ज्या दिवशी निवडणुका असतील त्याच्या दोन दिवस आधी राज्याच्या सीमेपासून ५किमी अंतराच्या आतील सर्व मद्यविक्रीची दुकाने, बार, परमिट हॉटेल उत्पादन शुल्क विभागाकडून बंद ठेवण्यात येणार आहे.

Intro:निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी मद्याचे आमिष दाखविले जाते. अशा प्रकरणात अंकुश ठेवण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकांना घेऊन आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागातर्फे अनधिकृत मद्य वाहतुकीवर कारवाई करण्यात येत आहे. राज्यात निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू होऊन 15 दिवस उलटून गेले असले तरी त्यामानाने केवळ 3 कोटी 71 लाख रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त करण्यात आला आहे.

राज्यात मद्य विक्रीचे प्रमाण देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असले तरी आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हवी तशी कारवाईत होताना मात्र दिसून येत नाही. राज्यात निवडणुकीचे वारे वाहायक लागले असून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राज्यातून बाहेर जाणाऱ्या व इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या अनधिकृत मद्यावर कारवाई साठी राज्याच्या सीमांवर Body:ग्राफिक्स इन

40 चेक नाके निर्माण करण्यात आले आहेत.

राज्यातील सर्व देशी व विदेशी मद्य कारखान्यावर सीसीटीवी च्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे.

11 मार्च ते 25 मार्च 2019 या काळात तब्बल 2211 गुन्हे दाखल

अनधिकृत हातभट्ट्या , रसायन , ताडी, देशी मद्य , विदेशी माद्यांचा यात समावेश

ग्राफिक्स आउटConclusion:
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत अनधिकृत मद्याची ने आन करणाऱ्या 100 गाड्यां जप्त करण्यात आल्या आहेत , यात दोन चाकी , तीन चाकी वाहनांचा अधिक समावेश आहे. महाराष्ट्र राज्याच्या सीमाना लागून असलेल्या इतर राज्यात ज्या दिवशी निवडणुका असतील त्याच्या 48 तास आगोदर राज्याच्या सीमेपासून 5 किलोमीटर आतील सर्व मद्याविक्रीची दुकाने , बार , परमिट हॉटेल उत्पादन शुल्क विभागाकडून बंद ठेवण्यात येणार आहे.

( ही बातमी चेअरमन सरांच्या कार्यालयातून सुचविण्यात आली होती ,कृपया त्यास स्पेशल स्टोरी म्हणून ट्रीट द्यावी.)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.