मुंबई: मुंबईच्या मढ मालवणी परिसरात समुद्री कायद्याचे उल्लंघन करून स्टुडिओ उभारण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारमधील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मंत्री अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने हे अनधिकृत स्टुडिओ उभारल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी केला होता. किरीट सोमैय्या यांनी या विरोधात वारंवार राष्ट्रीय हरित लवाद आणि मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार करून हा विषय न्यायालयात देखील नेला होता. राष्ट्रीय हरित लवादाने हे अनधिकृत स्टुडिओ पाडण्याचे आदेश दिले. त्यानंतर आज मुंबई महानगरपालिकेच्या तीने एरंगळ येथील बालाजी स्टुडिओवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
बेकायदेशीर शूटिंग स्टुडिओ बांधले: बीएमसीने मुंबईतील मढ येथे बेकायदेशीरपणे बांधलेल्या एका शूटिंग स्टुडिओ कॉम्प्लेक्सवर कारवाई केली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे आमदार आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांच्यावर या बेकायदा बांधकामाप्रकरणी टीका केली आहे. तर सोमैय्या यांनी आरोप केला आहे की, मुंबईतील मालाड भागातील मढ बेटावर त्यांच्या संगनमताने अनेक बेकायदेशीर शूटिंग स्टुडिओ बांधले गेले आहेत.
स्टुडिओवर हातोडा मारण्यात येणार: किरीट सोमैय्या यांनी आरोप केला आहे की, चित्रपटाच्या सेटसाठी तात्पुरते शेड उभारून येथे चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली होती. त्याचे नंतर सिमेंट आणि काँक्रीटचा बंगला आणि स्टुडिओमध्ये रूपांतर करण्यात आले. समुद्र किनाऱ्यावर असलेल्या मढ बेटावर असे अनेक बेकायदेशीर स्टुडिओ आहेत. त्यावर हातोडा मारण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बेकायदेशीर स्टुडिओ विरुद्ध सक्तीची कारवाई केली जाईल. हजारो चौरस मीटरमध्ये पसरलेले हे स्टुडिओ बनावट कागदपत्रांच्या आधारे उभारण्यात आल्याचा आरोप आहे.
कोरोनाच्या काळात बांधले स्टुडिओ: सोमैय्या यांनी या बेकायदा बांधकामांमध्ये बीएमसी आणि एमसीझेडएमए (महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी) अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. सुमारे १००० कोटी रुपयांच्या या भ्रष्टाचार प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार अस्लम शेख, पक्षाचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले आदित्य ठाकरे यांचाही सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे बेकायदेशीर स्टुडिओ कोरोनाच्या काळात बांधण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या स्टुडिओमध्ये रामसेतू, आदिपुरुष अशा अनेक मोठ्या चित्रपटांचे शूटिंग होणार असल्याचीही चर्चा आहे. त्यावर हातोडा मारण्याचे आदेश दिले असले तरी हे प्रकरण एनजीटीकडे गेले आणि अखेर एनजीटीने बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश दिले.
हेही वाचा: chatrapati sambhajinagar News 50 खोके घेऊन चोर आले रॅप साँग म्हणणाऱ्याला राज मुंगसेला अटक