ETV Bharat / state

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सुनावणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याबाबतचा निर्णय १९ जूनला - doctor

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मृत डॉ. पायल तडवी यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाच्या सुनावणीची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यावर आता १९ जूनला निर्णय होणार आहे.

डॉ. पायल तडवी- संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Jun 17, 2019, 5:27 PM IST

मुंबई- नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मृत डॉ. पायल तडवी यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाच्या सुनावणीची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यावर आता १९ जूनला निर्णय होणार आहे.

राज्य सरकारने डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी पीडित कुटुंबाला न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या व्हिडिओ रेकॉर्डिंगचा खर्च सुद्धा राज्य सरकारने करायला हवा, अशी मागणी तक्रारदार पक्षाचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

फिर्यादी पक्षाचे वकील अॅड गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया

सुनावणीची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याच्या मागणीवर सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करीत म्हटले की, या गुन्ह्याच्या न्यायालयीन सुनावणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास काही वेळ व परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी पोलीस विभागातर्फे राज्य शासनाशी बोलणी सुरू आहे. यास काही दिवस लागतील.

राज्य सरकारचा वेळ काढूपणा-

यावर तक्रारदार पक्षाचे वकील अॅड. सदावर्ते यांनी हा राज्य सरकारचा हा वेळ काढूपणा असून कलम १५ चे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. जोपर्यंत सुनावणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होत नाही तोपर्यंत आरोपींना जामीन देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली. यावर दोन्ही पक्षांचे बोलणे ऐकून न्यायालयाने या संदर्भात १९ जून पर्यंत सुनावणी तहकूब केली आहे.

Intro:नायर रुग्णालयातील डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असून सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान मयत डॉ पायल तडवी यांच्या कुटुंबियांच्या वतीने कोर्टात मागणी करण्यात आली की डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरणी सत्र न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीची विडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावी. राज्य सरकारने या बाबत पीडित कुटुंबाला न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे या व्हिडीओ रेकॉर्डिंग चा खर्च सुद्धा राज्य सरकारने करायला हवा अस फिर्यादी पक्षाचे वकील एड गुणरत्न सदावर्ते यांनी मागणी केली. Body:यावर सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करीत म्हटले की या गुन्ह्याची न्यायालईन सुनावणीचे विफिओ रेकॉर्डिंग करण्यास काही वेळ व परवानग्या घ्याव्या लागणार आहेत ज्या साठी पोलीस विभागातर्फे राज्य शासनाशी बोलणी सुरू असून यास काही दिवस लागतील. यावर फिर्यादी पक्षाचे वकिलांनी राज्य सरकारचा हा वेळ काढू पणा असून कलम 15 चे उल्लंघन असल्याचे एड. सदावर्ते यांनी म्हटले आहे. जो पर्यंत सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग होत नाही तो पर्यंत आरोपीना जामीन देऊ नये अशी मागणीही त्यांनी केली. या वर दोन्ही पक्षांचे बोलणे ऐकून न्यायालयाने या संदर्भात 19 जून पर्यंत सुनावणी तहकूब केली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.