ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिटामिनच्या औषधांची 'चलती'

author img

By

Published : Aug 18, 2020, 6:09 PM IST

भारतीयांची इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली असल्याचे म्हटले जाते. मात्र, भारतीय लोक योग-व्यायामावर भर देत नाहीत वा कामाच्या व्यापात खाणे-पिणे वेळेत होत नाही. त्यामुळे अनेकांमध्ये व्हिटामिन सी, डी, डी 3, बी कॉम्प्लेक्सची कमतरता असते. अशावेळी काही जण डॉक्टरांच्या सल्ल्याने वा स्वतःहून व्हिटामिन सी, डी, डी 3, झिंक, बी कॉम्प्लेक्स अशा औषधांचे सेवन करत आहेत.

vitamins
व्हिटामिन्स

मुंबई - गेल्या पाच महिन्यापासून मुंबई आणि राज्यातील सर्वच नागरिक कोरोनाच्या दहशतीखाली आहेत. मनामध्ये कितीही भीती असली तरी अनलॉकमध्ये पोटा-पाण्यासाठी अनेकांना घराबाहेर पडावेच लागले आहे. अशा नागरिकांनी स्वत:ची रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनिटी) वाढवण्यावर भर दिला आहे. तर घरी असणारे नागरिकही कोरोनापासून बचाव करण्यासाठी इम्युनिटी वाढवण्यावर भर देत आहेत. इम्युनिटी वाढवण्यासाठी योग्य आहाराचे सेवक केले जाते मात्र, त्याचबरोबर सोबतीने व्हिटामिनच्या औषधांचे सेवन गरजेचे मानत नागरिकांचा व्हिटामिनच्या औषधांकडे कल वाढला आहे. त्यामुळे गेल्या चार-महिन्यात व्हिटामिनच्या औषधांना प्रचंड मागणी वाढली आहे. याअनुषंगाने कंपन्यांनी उत्पादनही वाढले आहे. एकूणच आता व्हिटामिनच्या औषधांची आणि त्याबरोबरीने उत्पादक कंपन्यांचीही 'चलती' असल्याचे चित्र आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिटामिनच्या औषधांना मागणी वाढली आहे

भारतीयांची इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली असल्याचे म्हटले जाते. मात्र, भारतीय लोक योग-व्यायामावर भर देत नाहीत वा कामाच्या व्यापात खाणे-पिणे वेळेत होत नाही. त्यामुळे अनेकांमध्ये व्हिटामिन सी, डी, डी 3, बी कॉम्प्लेक्सची कमतरता असते. अशावेळी काही जण डॉक्टरांच्या सल्ल्याने वा स्वतःहून व्हिटामिन सी, डी, डी 3, झिंक, बी कॉम्प्लेक्स अशा औषधांचे सेवन करतात. गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी या औषधांचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी होते. एप्रिल महिन्यापासून मात्र, व्हिटामिनच्या औषधांची मागणी प्रचंड वाढली आहे, अशी माहिती रायगड फार्मासिस्ट फोरमचे अध्यक्ष शशांक म्हात्रे यांनी दिली.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी इम्युनिटी वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी व्हिटामिनची औषधे उपयोगी ठरतात, अशी मानसिकता तयार झाल्याने या औषधांची मागणी वाढली आहे. ही औषधे शेड्युलमध्ये येत नाहीत त्यामुळे या औषधांसाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नसते. नागरिक स्वत:ही या औषधांची खरेदी करू शकतात. औषधांची मागणी खुपच वाढल्याने कंपन्यानी देखील या संधीचा फायदा घेत व्हिटामिनच्या औषधाचे उत्पादन वाढवले आहे, असेही म्हात्रे यांनी सांगितले. अचानक मागणी वाढल्याने एप्रिलमध्ये औषधांचा थोडाफार तुडवडा जाणवला. नंतर मात्र कंपन्यांनी उत्पादन वाढवल्याने सध्या कुठेही या औषधांचा तुडवडा जाणवत नाही, असेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

सावधान! साईड इफेक्टही लक्षात घ्या -

कोरोनापासून बचाव करण्यासाठी इम्युनिटी वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी व्हिटामिनच्या औषधांचे सेवन करणेही आवश्यक असते. त्यामुळे आता नागरिकांचा कल व्हिटामिनच्या औषधांकडे वाढला आहे. यादरम्यान ज्यांना अजिबात या औषधांची गरज नाही ते देखील ही औषधे घेत आहेत. अशावेळी साईट इफेक्टस होण्याची शक्यता असल्याची माहिती धारावीतील डॉ. ज्ञानेश्वर वाघमारे यांनी दिली. व्हिटामिन सी आणि झिंकच्या अतिसेवनामुळे पोटाचे विकार होतात तर, किडनी स्टोनचीही भीती वाढते. व्हिटामिन डीच्या अतिसेवनामुळे शरीरावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही औषधे घेणे कधीही योग्य. व्हिटामिन सी, डी, डी 3 आणि झिंक शरीराला मिळावे यासाठी लिंबू, संत्री, मोसंबी या फळांचा आहारात समावेश करावा, असा सल्लाही डॉ. वाघमारे यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.