ETV Bharat / state

Ahmednagar Name change : अहमदनगर, इस्लामपूरच्या नावाच्या बदलाचीही मागणी - इस्लामपूरच्या नावाच्या बदलाचीही मागणी

महाराष्ट्रामधील ज्या जिल्ह्यांना मुस्लिम नावे आहेत ती बदलण्याची मागणी गेले कित्येक वर्षे केली जात होती. त्यामधील औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे तसेच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तालुक्याचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली.

Demand for change of name of Islampur
इस्लामपूरच्या नावाच्या बदलाची मागणी
author img

By

Published : Feb 25, 2023, 12:27 PM IST

मुंबई: महाराष्ट्रामध्ये असलेल्या जिल्ह्यांपैकी औरंगाबाद उस्मानाबाद आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांची नावे तसेच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तालुक्याचे नाव मुस्लिम आहेत. या तीनही जिल्ह्यांची नावे बदलण्याची मागणी गेले कित्येक वर्षे केली जात आहे. यानुसार औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली होती ही नावे बदलण्यास केंद्र सरकारने ही मंजुरी दिली असल्याने या दोन्ही जिल्ह्यांची नावे आता बदलण्यात आली आहे.

इस्लामपूर नामांतराची मागणी: औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्याप्रमाणे अहमदनगर या जिल्ह्याचे तसेच इस्लामपूर तालुक्याचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेकडून अहमदनगरचे नाव अंबिका नगर, हिंदू राष्ट्र सेनेकडून श्रीराम नगर करण्याचे तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहिल्याबाई होळकर नगर असे नामांतर करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या तालुक्याचे नाव ईश्वर करावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे. संभाजी भिडे यांच्या शिव प्रतिष्ठान या संघटनेने सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देवून इस्लामपूर नाव ईश्वरपुर करण्याची मागणी केली आहे.

प्रस्ताव केंद्राला पाठवणार: दरम्यान, अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच नाव देण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली याबाबतचा प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता. त्यावर अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच नाव देण्यात यावं असा प्रस्ताव केंद्र सरकारला लवकरच पाठवण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली होती.

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्यातील दोन शहरांची नावे बदलण्यास केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती शुक्रवारी दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव'! राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मान्यता! पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह, यांचे खूप खूप धन्यवाद! मुख्यमंत्री एकनाथजींच्या नेतृत्वाखालील सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास मंत्रिमंडळाने मंजूरा दिली आहे. औरंगाबादचे नामकरण करण्याची शिफारस ही १६ जुलै २०२२ रोजी मंत्रिमंडळात करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचे सांगितले आहे.

20 वर्षापासूनची मागणी : महाराष्ट्रात गेली 20 वर्षापासून पासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचे नामांतर करण्याची मागणी सुरु होती. यापूर्वी ठाकरे सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत उस्मानाबादला धाराशिव व औरंगाबाद शहराला संभाजीनगर असे नाव देण्यात आले. परंतु शिंदे सरकार आल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देऊन पुन्हा मंत्रिमंडळात प्रस्ताव आणून दोन्ही शहरांची नावे बदलण्यात आली. तसेच याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

हेही वाचा: Shiv Jayanti 2023 इतिहासात पहिल्यांदा आग्र्याच्या किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.