ETV Bharat / state

सावधान! डेल्टा प्लस अधिक वेगवान, बंद खोलीतही पसरतो; काळजी घेण्याची गरज - new corona

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. त्यात आता कोरोनाचा डेल्टा आणि डेल्टा प्लस हा व्हेरिएंट आला आहे. त्यामुळे पूर्वीच्या कोरोनापेक्षा तो ५० टक्क्यांहून अधिक वेगाने पसरतो. डेल्टा प्लस हा हवेतून गर्दीच्या ठिकाणी आणि बंद खोलीत पसरतो, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे.

mumbai
mumbai
author img

By

Published : Jun 28, 2021, 10:14 PM IST

मुंबई - 'गेल्या दीड वर्षापासून जगभरात कोरोनाचा प्रसार सुरू आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाच्या तीन व्हेरिएंटचा प्रसार झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट घेऊन आलेला डेल्टा व्हेरिएंट, तसेच त्यात बदल झालेला डेल्टा प्लस व्हेरिएंट हा गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून प्रसार झालेल्या कोरोना विषाणूपेक्षा अधिक गतीने पसरतो. कोरोनापेक्षा तो ५० टक्क्यांहून अधिक वेगवान आहे', अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. तर डेल्टा प्लस हा हवेतून गर्दीच्या ठिकाणी आणि बंद खोलीत पसरतो, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

'डेल्टा-डेल्टा प्लसची प्रसार क्षमता अधिक, काळजी घेण्याची गरज'

मुंबईमध्ये गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरु झाला. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयानक होती. पहिल्या लाटेत जितके रुग्ण आढळून आले, त्यापेक्षा जास्त रुग्ण दुसऱ्या लाटेत तेही गेल्या तीन ते चार महिन्यात आढळून आले आहेत. दुसऱ्या लाटेचा प्रसार कमी होत असतानाच तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर काकाणी यांनी ही माहिती दिली. 'कोरोना विषाणूप्रमाणेच डेल्टा आणि डेल्टा प्लसवर उपचार केले जातात. याची उपचारपद्धती सारखीच आहे. मात्र, कोरोनाच्या पहिल्या विषाणूपेक्षा डेल्टा आणि डेल्टा प्लसची प्रसार क्षमता अधिक आहे. यामुळे काळजी घेणायची गरज अधिक आहे. कोरोनाच्या त्रिसूत्रीची म्हणजेच मास्क घालणे, हात सतत धुणे आणि गर्दीत कमी प्रमाणात जाणे याची अंमलबजावणी केल्यास विषाणूपासून बचाव होऊ शक', असे काकाणी यांनी सांगितले.

हवेतून, बंद खोलीत पसरतो डेल्टा -

'मुंबईत गेल्यावर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार आहे. गेल्यावर्षी आलेला कोरोना विषाणू हा पृष्ठभागाद्वारे पसरत होता. मात्र, त्यात बदल होऊन डेल्टा हा व्हेरिएंट आला. त्यात आता पुन्हा बदल होऊन डेल्टा प्लस या विषाणूचा प्रसार सुरू झाला आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लस हे दोन्ही विषाणू हवेतून पसरतात. गर्दी आणि बंद खोलीत डेल्टा आणि डेल्टा प्लसचे विषाणू पसरतात', अशी माहिती केईएमचे डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

काय आहे डेल्टा व्हेरिएंट?

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये प्रथम नोंदवलेला डेल्टा प्रकार हा पूर्वीपेक्षा अधिक वेगवान होता. एम्समध्ये नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, 2021 मध्ये हाच व्हेरिएंट देशातील दुसर्‍या लाटेचे कारण ठरला. सुरुवातीच्या काळात चीनमधून हा विषाणू भारतात आला आहे आणि सध्या देशभरात या विषाणूचा प्रादुर्भाव सुरू आहे. डेल्टा हा कोरोना विषाणूचा जनुकीय बदल झाल्यामुळे तयार झालेला प्रकार आहे. या विषाणूमध्ये असे बदल नियमित होत असतात. त्याची संसर्गक्षमता आता अधिक वाढली आहे. त्यामुळे पूर्वी जी लक्षणे सहा ते सात दिवसांनी दिसायची, ती आता संसर्ग झाल्यानंतर लवकर दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ न दवडता त्वरित डॉक्टरांकडे गेल्यास लक्षणांची तीव्रता वाढणार नाही. डेल्टा विषाणू हा अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्व व्यक्तींमध्ये चटकन पसरतो. तो आधीच्या स्ट्रेनपेक्षा शरीरात लवकर पसरतो. त्यामुळे आजाराची लक्षणे चार ते पाच दिवसात दिसू लागतात. या स्ट्रेनचा संसर्ग झाल्यास औषधोपचार हे कोरोनाच्या उपचारपद्धतीसारखेच आहेत. मास्क वापरणे, हात धुणे आणि गर्दीत न जाणे ही त्रिसूत्री पाळणे गरजेचे आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंट -

नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंट (B.1.617.2.1 किंवा AY.1) डेल्टा मधील उत्परिवर्तनामुळे किंवा B.1.617.2, व्हेरिएंटमुळे तयार झाला आहे. N501Y मधील पूर्वीच्या डेल्टा उत्परिवर्तीच्या बाजूने, डेल्टा प्लसमध्ये K417Nचे उत्परिवर्तन आहे. संशोधकांना वाटते, की या दोन उत्परिवर्तनांमुळे हा विषाणू अधिक संक्रमित होऊ शकतो. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ सांगतात, की कोविड-19 हा RNA व्हायरस आहे. त्यामुळे व्हारस म्युटेट होण्याची शक्यता खूप जास्त असते. "डेल्टा व्हेरिएंटमध्ये आणखी म्युटेशन झाल्यामुळे नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंट तयार झाला. 'डेल्टा प्लस' व्हेरिएंटमध्ये डेल्टामधील सर्व म्युटेशन आहेत. याबाबतची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

हेही वाचा - मुंबईकरांसाठी गुड न्यूज.. ५० टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.