मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
-
आज दिल्ली के लोगों को शिवसेना और उद्धव जी का साथ मिला। जन विरोधी और दिल्ली विरोधी क़ानून को मिलकर संसद में पास नहीं होने देंगे। दिल्लीवालों की तरफ़ से उद्धव जी का बहुत-बहुत शुक्रिया। pic.twitter.com/5MiP89sulC
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">आज दिल्ली के लोगों को शिवसेना और उद्धव जी का साथ मिला। जन विरोधी और दिल्ली विरोधी क़ानून को मिलकर संसद में पास नहीं होने देंगे। दिल्लीवालों की तरफ़ से उद्धव जी का बहुत-बहुत शुक्रिया। pic.twitter.com/5MiP89sulC
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 24, 2023आज दिल्ली के लोगों को शिवसेना और उद्धव जी का साथ मिला। जन विरोधी और दिल्ली विरोधी क़ानून को मिलकर संसद में पास नहीं होने देंगे। दिल्लीवालों की तरफ़ से उद्धव जी का बहुत-बहुत शुक्रिया। pic.twitter.com/5MiP89sulC
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 24, 2023
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला वचन दिले आहे. ते अध्यादेशाविरोधातील लढ्याला पाठिंबा देतील. आम्ही नातेसंबंध जपवणारे लोक आहोत. राजकारण आपल्या जागी आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
सीबीआयने शिवसेनेचे सरकार पाडले : 8 वर्षांच्या प्रदीर्घ लढाईनंतर सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला दिल्ली चालवण्याचा अधिकार मिळाला आहे. आठ दिवसांत केंद्र सरकारने अध्यादेश काढून ते अधिकार परत घेतले. लोकशाहीत निवडून आलेल्या सरकारकडे सत्ता असली पाहिजे. लोकशाहीत सत्ता लोकांनी चालवली पाहिजे. भाजपचे लोक न्यायाधीशांच्या विरोधात मोहीम चालवतात. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून शिवसेनेचे सरकार पाडण्यात आले. दिल्लीतही आमच्या आमदारांना विकत घेण्यासाठी ऑपरेशन लोटस चालवण्यात आले. पंतप्रधानांचे नाव न घेता ते म्हणाले की, अशी व्यक्ती देश चालवू शकत नाही. ते अहंकारात जगत आहेत. एवढेच नाही तर, पंजाबच्या राज्यपालांनी यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ दिले नाही. त्यामुळेच राज्यसभेतील सर्व विरोधी पक्षांनी मिळून केंद्राची विधेयके राज्यसभेत फेकणे गरजेचे आहे. असे झाले तर 2024 नंतर हे सरकार पुन्हा येणार नाही.
-
आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जी ह्यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली असता त्यांचे स्वागत केले. ह्या भेटीदरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीच्या शिक्षणमंत्री अतिशी मार्लेना, आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा, खासदार संजय… pic.twitter.com/gHOzCZO5Dy
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जी ह्यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली असता त्यांचे स्वागत केले. ह्या भेटीदरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीच्या शिक्षणमंत्री अतिशी मार्लेना, आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा, खासदार संजय… pic.twitter.com/gHOzCZO5Dy
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 24, 2023आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जी ह्यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली असता त्यांचे स्वागत केले. ह्या भेटीदरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीच्या शिक्षणमंत्री अतिशी मार्लेना, आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा, खासदार संजय… pic.twitter.com/gHOzCZO5Dy
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 24, 2023
'या देशात लोकशाही कायम ठेवण्यासाठी आपण सगळे एकत्र आहोत. आज पासून आपण सत्ताधाऱ्यांना विरोधी म्हटलं पाहिजे. गेल्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाने दोन महत्वाचे निकाल दिले आहेत. आपच्या संदर्भात जो निर्णय दिला तो लोकशाहीसाठी आवश्यक होता. पण, केंद्राने अध्यादेश आणला. राज्यांचा अधिकार काढून घेतला. 2024 नंतर राज्यात निवडणूक होणारच नाही अशी परिस्थिती निर्माण होईल." - उद्धव ठाकरे
देश कुणाच्या बापाचा नाही : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, देश ही कुणाच्या बापाची संपत्ती नाही. पुढील 35 वर्षे त्यांनी स्वतःला पंतप्रधान मानले आहे. लोकशाही धोक्यात आहे. निवडून आलेल्या सरकारला त्रास दिला जात आहे. राज्यपाल हे भाजपचे स्टार प्रचारक बनले आहेत.
निवडून आलेल्या प्रतिनिधींनी वापरण्याची शक्ती : त्याच वेळी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की नोकरशाहीवरील अधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. लोकशाहीसाठी ते आवश्यकही आहे, मात्र केंद्र सरकारने अध्यादेश आणून चुकीचे केले आहे.
केजरीवाल-ठाकरे या दोघांना एकमेकांची गरज आहे. विरोधक एकत्र आले तरी भाजपवर परिणाम होत नाही. केजरीवाल-ठाकरे भेटीवरून महाराष्ट्राची ताकद दिसत आहे. सापनाथ, नागनाथ साथ जाओ- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सापनाथ, नागनाथ साथ जाओ- आपचे संस्थापक अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. 2024 लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षनेत्यांच्या भेटीला महत्त्व आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधकांकडून एकीचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान यांनी मुंबईत येऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत दोन तास सविस्तर चर्चा केली आहे.
हेही वाचा -