मुंबई: या संदर्भात बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या ( BJP leader Kirit Somaiya ) म्हणाले की, १०० कोटी शौचालय घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी आमच्यावर मोठमोठे आरोप केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जानेवारी महिन्यात आमच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले होते. परंतु चार महिन्यात शंभर पैशाचाही घोटाला समोर आलेला नाही. मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aditya Thackeray) इतर आमदार, खासदार यांनी चौकशीची मागणी केली होती. परंतु एवढा गाजावाजा करूनही घोटाळा बाहेर आलेला नाही.
सोमय्या म्हणाले की, हा मानहानीचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी केला आहे. दोन वर्षांपासून महा विकास आघाडी सरकारमधील नेते व मंत्री यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढण्याचे काम सातत्याने करत आहेत. त्यातच माजी गृहमंत्री अनिल देशमुख व माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे कारागृहात आहेत,ठाकरे सरकार मधील एक डझन मंत्री व नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहे. मी कुठल्याही चौकशीला तयार असून संजय राऊत यांच्या वरील मानहानीचा खटला हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठी केल्याचे त्यांनी सांगितले.
किरीट सोमय्या यांनी कुटुंबांच्या संस्थेच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. मिरा- भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा घोटाळा झाला आहे, असे संजय राऊत म्हणाले होते. तसेच ही मंडळी कुठे कुठे पैसे खातात पहा. विक्रांत पासून ते इथपर्यंत असा टोला राऊत यांनी लगावला होता. सोमय्या आणि त्याचे कुटुंब युवा प्रतिष्ठान नावाची संस्था चालवत होते. त्यांनी केलेल्या या शौचालय घोटाळ्याची कागदपत्रे पाहून हसायला आले. खोटी बिले, पर्यावरणाचा ऱ्हास करून निर्माण केलेले शौचालय, पैसे कसे काढले याची माहिती बाहेर येईल, अस संजय राऊत म्हणाले होते.