मुंबई- राज्यात कोरोनाची दुसरी लाट कमी होतानाच चित्र दिसते हे चित्र दिलासादायक आहे. या दिलासादायक दिसणाऱ्या चित्रामुळे राज्यातल्या अनेक भागांमध्ये टाळेबंदी शिथील करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसात राज्यातल्या वाढणाऱ्या रुग्ण संख्येचा आलेख आता उतरता दिसू लागला आहे. ज्या जिल्ह्यात कमालीची घट दिसून येत आहे या जिल्ह्यात टाळेबंदी च्या निर्बंधात सूट आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.76 टक्के एवढे आहे. राज्यात आज 9 हजार 101 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर नव्याने 9 हजार 361 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात 24 तासात 190 रुग्णांनी उपचारादरम्यान आपले प्राण गमावले आहेत. राज्यात मृत्यूदर 1.97 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 57 लाख 19 हजार 457 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 59 लाख 72 हजार 781 इतकी आहे.
आठ मंडळामध्ये रुग्णसंख्येचा आलेख उतरताच
कोरोना काळामध्ये आरोग्य विभागाकडून महाराष्ट्रामध्ये आठ मंडळ निर्माण करण्यात आली होती. या आठही मंडळामध्ये रुग्णसंख्येचा आलेख उतरताच आहे. मात्र इतर मंडळाच्या तुलनेत कोल्हापूर मंडळाचा रुग्णसंख्येचा आलेख चढाच दिसून येतोय. कोल्हापूर मंडळ 24 तासांतील एकूण 2 हजार 823 रुग्णांची नोंद झाली आहे. तर नागपूर मंडळ सर्वात कमी 24 तासांतील एकूण 133 रुग्णांची नोंद झाली आहे .
24 तासांतील एकूण रुग्णसंख्या
महाराष्ट्रातली मंडळ आणि तिथली रुग्णसंख्या मुंबई मंडळ 24 तासांतील एकूण रुग्णसंख्या-2643 नाशिक मंडळ 24 तासांतील एकूण रुग्णसंख्या-828 पुणे मंडळ 24 तासांतील एकूण रुग्णसंख्या- 2180 कोल्हापूर मंडळ 24 तासांतील एकूण रुग्णसंख्या- 2823 औरंगाबाद मंडळ 24 तासांतील एकूण रुग्णसंख्या- 204 लातूर मंडळ 24 तासांतील एकूण रुग्णसंख्या-317 अकोला मंडळ 24 तासांतील एकूण रुग्णसंख्या-233 नागपूर मंडळ 24 तासांतील एकूण रुग्णसंख्या- 133