ETV Bharat / state

वरवरा राव यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय राखीव

भीमा कोरेगाव प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 81 वर्षीय वरवरा राव यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. वरवरा राव यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील नानावटी रुग्णालयामध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाने उपचार सुरू आहेत.

Bhima Koregaon case Varvara Rao
वरवरा राव जामीन याचिका निर्णय
author img

By

Published : Feb 1, 2021, 8:39 PM IST

मुंबई - भीमा कोरेगाव प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 81 वर्षीय वरवरा राव यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. वरवरा राव यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील नानावटी रुग्णालयामध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाने उपचार सुरू आहेत. राव यांच्या कुटुंबीयांकडून जामीन याचिका दाखल करण्यात आलेली असून यावर गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरू होती.

एनआयएने केला जामीनाला विरोध

राष्ट्रीय तपास यंत्रणेने वरवरा राव यांच्या जामिनाला विरोध केला होता. याचिकेत म्हटले आहे की, वरवरा राव यांच्यावर लावण्यात आलेले कलम हे खुपच गंभीर असून भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात ते मुख्य आरोपींपैकी एक असल्याचे सांगण्यात आले होते. भीमा कोरेगाव प्रकरणी पुणे पोलिसांकडून नोव्हेंबर 2018 मध्ये 5 हजार 5 आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यामध्ये सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत यांचे सुद्धा नाव आहे.

हेही वाचा - अर्थसंकल्प २०२१ : ..तर नागरिकांकडे आणखीन पैसा राहिला असता - अर्थतज्ञ जी. चंद्रशेखर

या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींचा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाशी संबंध असून आरोपींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे ठार मारण्याची योजना आखली असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. यानंतर फेब्रुवारी 2019 मध्ये पुन्हा एकदा अतिरिक्त आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यामध्ये सुधा भारद्वाज, वरवरा राव, अरुण फेरेरा, वरून गोन्साल्विस यांना आरोपी म्हणून दाखवण्यात आले आहे.

हेही वाचा - अर्थसंकल्पातून महाराष्ट्राचा अपेक्षाभंग - अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.