ETV Bharat / state

Actress Uorfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेदला  जीवे मारण्यासह  बलात्काराची धमकी, गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Urfi Javed Instagram handle

अभिनेत्री उर्फी जावेद हिला जीवे मारण्याच्या आणि बलात्काराची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात ( Actress Uorfi Javed police complaint ) नवीन गिरी नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Actress Uorfi Javed
Actress Uorfi Javed
author img

By

Published : Dec 18, 2022, 12:01 PM IST

Updated : Dec 18, 2022, 12:25 PM IST

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद हिला जीवे मारण्याच्या आणि बलात्काराची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात ( Actress Uorfi Javed police complaint ) नवीन गिरी नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अभिनेत्री उर्फी जावेद अश्लील भाषेत शिवीगाळ आणि व्हॉट्सअॅपवर कॉल करून बलात्काराची धमकी मिळाली आहे. वेगवेगळ्या नंबरवरून कॉल रेकॉर्डिंग पाठवण्यात आले. याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात नवीन गिरी नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विचित्र फॅशन सेन्समूळे ओळखली जाणारी उर्फी जावेद ही कधी कोणती फॅशन करेल याचा काही भरोसा नाही. उर्फी जावेद कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते आणि त्यामूळे ट्रोलच्या निशाण्यावर येते. आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमपर्यंत बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे.

यापूर्वीही उर्फीला मिळाली होती धमकी- उर्फीला यापूर्वीही धमकी मिळाली होती. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर Urfi Javed Instagram handle आरोपीसोबतचे तिचे व्हॉट्सअ‍ॅप्स चॅट्स आणि त्याचे फोटो शेअर केले होते आणि लिहिले होते म्हणून हा माणूस मला इतके दिवस त्रास देत आहे आणि आता मला खूप त्रास झाला. 2 वर्षांपूर्वी कोणीतरी माझा फोटो मॉर्फ केला आणि तो व्हायरल Urfi Javed viral photo करण्यास सुरुवात केली. मी त्याबद्दल 2 वर्षांपूर्वी आधीच पोलिसात तक्रार दाखल केली होती. या व्यक्तीने मला त्याच्यासोबत व्हिडिओ सेक्स करण्यासाठी ब्लॅकमेल करत होता. अन्यथा तो फोटो विविध ठिकाणी व्हायरल करेल, अशी धमकी दिली. माझे करिअर उद्ध्वस्त केले. होय, तो मला सायबर रेप करण्यासाठी ब्लॅकमेल करत होता अशी उर्फीने इंस्टाग्रामवर दिली आहे.

कास्टिंग काऊच डायरेक्टरवर आरोप उर्फी जावेदने अलीकडेच पंजाबी इंडस्ट्रीतील एका व्यक्तीवर विनयभंगाचा आरोप केला होता. त्याचबरोबर तक्रार नोंदवूनही मुंबई पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, आता उर्फीने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करून मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. उर्फीचा विनयभंग करणाऱ्या या व्यक्तीचे नाव ओबेद आफ्रिदी असून तो पंजाब इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करत होता. उर्फीच्या आरोपांनंतर एका मुलाखतीत ओबेदने अभिनेत्रीचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि म्हणाले, मला उर्फीशी वाद घालायचा नाही. कारण तिच्याकडे मेंदू नाही. मी तिच्यासोबत काम केले आहे आणि आमच्यात पैशांवरून तणाव सुरू होता.

Last Updated : Dec 18, 2022, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.