मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासामध्ये अशी माहिती समोर आली आहे की, दाऊदची दुसरी पत्नी ही पाकिस्तानी पठाण समुदायामधील आहे. एनआयला दुसऱ्या लग्नासंदर्भात दाऊदच्या नातेवाईकानेच माहिती दिली. मात्र, या व्यक्तीने दाऊदची ही दुसरी पत्नी कुठे राहते आणि नेमके लग्न कधी झाले याबद्दलची माहिती दिली नाही. दाऊद सध्या 67 वर्षांचा आहे.
-
Dawood Ibrahim lied about divorce, remarried Pakistani woman: Haseena Parkar's son tells NIA
— ANI Digital (@ani_digital) January 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/Py6OSFsKJ0#Dawood #NIA #HaseenaParkar #Terror #Pakistan pic.twitter.com/RipbjpaEd0
">Dawood Ibrahim lied about divorce, remarried Pakistani woman: Haseena Parkar's son tells NIA
— ANI Digital (@ani_digital) January 17, 2023
Read @ANI Story | https://t.co/Py6OSFsKJ0#Dawood #NIA #HaseenaParkar #Terror #Pakistan pic.twitter.com/RipbjpaEd0Dawood Ibrahim lied about divorce, remarried Pakistani woman: Haseena Parkar's son tells NIA
— ANI Digital (@ani_digital) January 17, 2023
Read @ANI Story | https://t.co/Py6OSFsKJ0#Dawood #NIA #HaseenaParkar #Terror #Pakistan pic.twitter.com/RipbjpaEd0
दुसऱ्या विवाहबाबत माहिती : दुसऱ्या विवाहासाठी दाऊदने पहिली पत्नी मेहजबिन हिला घटस्फोट दिल्याचे सांगितले होते. पण ती जाणीवपूर्वक पसरवलेली अफवा होती. उलट महेजबिन दाऊदच्यावतीने भारतातील नातेवाईकांच्या संपर्कात असल्याची माहिती दाऊदच्या भाचा आणि हसीना पारकरचा मुलगा आलिशाह पारकर याने एनआयएच्या चौकशीत दिली. आलीशहा पारकर हा मुंबई सेंट्रल येथील दूधवाला अपार्टमेंट येथे सध्या वास्तव्यास आहे.
दाऊदची पहिली पत्नी दुबईत भेटली : अलीशाहने सांगितले की, तो दाऊदची पहिली पत्नी मेहजबिन हिला जुलै 2022 मध्ये दुबईत भेटला होता. महजबिननेच दाऊद इब्राहिमच्या दुसऱ्या लग्नाबद्दल अलीशाह याला सांगितले होते. अलीशाहच्या म्हणण्यानुसार, दाऊद इब्राहिमची पहिली पत्नी महजबिन ही एकमेव आहे जी प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी व्हॉट्सअप कॉलद्वारे भारतील दाऊदच्या नातेवाईकांशी संपर्कात असते.
घरचा पत्ताही बदलला : दाऊदने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानातील आपला पत्ता बदलला. सध्या तो कराचीतील पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यातील जागेत राहतो. याचा सुगावाही यंत्रणांना या चौकशीत लागला आहे. तपास यंत्रणांना मिळाळेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच दाऊद नव्या घरात रहायला गेला आहे. सध्या तो कराचीमध्ये पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाशी संबंधित परिसरामध्ये वास्तव्यास आहे. दाऊद सध्या कराचीत अब्दुल्ला गाझिबाबा दर्ग्याच्या मागच्या बाजूला असलेल्या रहीम फाकी परिसरात संरक्षण खात्याच्या ताब्यातील जागेत राहत आहे.
दाऊदची असू शकते ही चाल : तपास यंत्रणांनी आपला रोख त्याची पहिली पत्नी महजबिनपासून हटवावा. यासाठी दुसरा विवाह ही दाऊदची काही वेगळी चाल असू शकते का, असा तपास यंत्रणांना संशय आहे. अलीशाह याने राष्ट्रीय तपास एजन्सी एनआयला सांगितले की तो दाऊदची पहिली पत्नी महजबिन हिला जुलै 2022 मध्ये दुबईत भेटला होता. तिनेच आपल्याला दाऊदच्या दुसऱ्या पत्नीबद्दल सांगितले.