ETV Bharat / state

पावसामुळे तलावातील पाणीसाठ्यात वाढ, मुंबईकरांना पुढील २४ दिवस पुरेल एवढा पाणीसाठी

गेल्या तीन दिवसात पडलेल्या पावसामुळे मुंबईतील तलावांमधील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत तलावात ८७ हजार ६४८ दशलक्ष लिटर इतका म्हणजे पुढील २४ दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे.

पावसामुळे तलावांतील पाणीसाठयात वाढ
author img

By

Published : Jun 30, 2019, 3:14 PM IST

मुंबई - मागील वर्षी परतीचा पाऊस न पडल्यामुळे पालिकेला राखीव पाणीसाठा वापरावा लागत होता. मात्र गेल्या तीन दिवसात पडलेल्या पावसामुळे मुंबईतील तलावांमधील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत तलावात ८७ हजार ६४८ दशलक्ष लिटर इतका म्हणजे पुढील २४ दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे.

मुंबईला वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा लागतो. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये तलावांमध्ये दोन लाख दशलक्ष लिटर पाणी कमी होते. त्यामुळे नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईकरांवर १० टक्के पाणीकपात लागू केली होती. ही पाणीकपात आजही कायम आहे.

मुंबईसह ठाणे जिल्ह्यात गेले दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसामुळे शुक्रवारी तलावांमध्ये ७१ हजार १७ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. गेल्या शनिवारी तलावांत ७६ हजार ८३३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला होता. आज सकाळी ६ वाजेपर्यंत तलावांत ८७ हजार ६४८ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

हा पाणीसाठा मुंबईकरांना पुढील २४ दिवस पुरेल इतका आहे. जुलै, ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडून मुंबईला लागणारा पाणीसाठा तलावांमध्ये जमा होईल, अशी अपेक्षा पालिकेच्या जल विभागाला आहे.

तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

  • अप्पर वैतरणा -: ० (शून्य)
  • मोडकसागर -: ३२,४४७
  • तानसा -: ७,४४७
  • मध्य वैतरणा -: ३७,१६५
  • भातसा -: ३,१०२
  • विहार -: ४,०४२
  • तुळशी -: २,९९५
  • एकूण -: ८७,६४८

Intro:मुंबई - 
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात मागील वर्षी परतीचा पाऊस पडलेला नाही. या वर्षीही जून संपला तरी अपेक्षित पाऊस पडलेला नाही. यामुळे तलाव क्षेत्रात पाणीसाठा कमी झाला होता. पालिकेला राखीव पाणीसाठा वापरावा लागत होता. मात्र गेल्या तीन दिवसात पडलेल्या पावसामुळे तलावांत पाणी साठ्यात वाढ झाली आहे. रविवारी सकाळी ६ पर्यंत तलावात ८७ हजार ६४८ दशलक्ष लिटर इतका म्हणजे पुढील २४ दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. Body:मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत गेल्या वर्षी पावसाळ्यात कमी पाऊस पडला. मुंबईला वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा लागतो. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये तलावांमध्ये दोन लाख दशलक्ष लिटर पाणी कमी असल्याने नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईकरांवर १० टक्के पाणीकपात लागू केली होती. ही पाणीकपात आजही कायम आहे. तलावक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला नाही तर मुंबईकरांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. 

मुंबईसह ठाणे जिल्हयात गेले दोन दिवस पाऊस पडत आहे. पावसामुळे शुक्रवारी तलावांत ७१ हजार १७ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. शनिवारी गेल्या तलावांत ७६ हजार ८३३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला होता. आज सकाळी ६ वाजेपर्यंत तलावांत ८७ हजार ६४८ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला सध्या दिवसाला ३ हजार ६५० दशलक्ष लिटर इतका पाणी लागते. हा पाणीसाठा मुंबईकरांना पुढील २४ दिवस पुरेल इतका आहे. जुलै, ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडून मुंबईला लागणारा पाणीसाठा तलावांमध्ये जमा होईल अशी अपेक्षा पालिकेच्या जल विभागाला आहे. 

तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा  -:  ० (शून्य)
मोडकसागर    -: ३२,४४७ 
तानसा            -:   ७,४४७
मध्य वैतरणा    -: ३७,१६५
भातसा           -:  ३,१०२
विहार            -:    ४,०४२
तुळशी           -:    २,९९५
एकूण            -: ८७,६४८Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.