हैदराबाद : जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी मेटा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर आधारित सर्च इंजिन तयार करत आहे. या नवीन सर्च इंजिनसह, मेटा अल्फाबेटच्या गुगल आणि मायक्रोसॉफ्टच्या बिंज सर्च इंजिनवरील आपलं अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करेल. द इन्फॉर्मेशननं आपल्या रिपोर्टमध्ये या AI सर्च इंजिनच्या विकासाबाबत माहिती दिली आहे. या शोध इंजिनमुळं, मेटा Google आणि Binge वरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करेल.
Google आणि Microsoft देखील AI वर काम सुरू : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दैनंदिन वापराच्या साधनांची लोकप्रियता पाहून केवळ OpneAIच नाही तर ChatGPT बनवणारी कंपनी, Google आणि Microsoft देखील AI सर्च इंजिनवर काम करत आहेत. Google नं AI ला त्याच्या विद्यमान शोध इंजिनमध्ये समाकलित केलं असून मायक्रोसॉफ्ट देखील अनेक AI टूल्स ऑफर करत आहे.
Meta वरून मिळणा उत्तर : याचा फायदा मेटाच्या एआय सर्च इंजिनचा होणार आहे. Meta च्या नवीन वेब क्रॉलरसह, वापरकर्त्यांना Meta AI द्वारे समर्थित उत्तरे मिळतील. कंपनीच्या मेटा एआय चॅटबॉटचा फायदा यूजर्सना व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर मिळणार आहे. अहवालात, नवीन शोध इंजिनच्या विकासाशी संबंधित सूत्रांचा हवाला देत, असं म्हटलं आहे की, कंपनी विद्यमान AI क्षमतांमध्ये सतत सुधारणा करत आहे.
गुगलवरील अवलंबित्व कमी होणार : वापरकर्त्यांना बातम्या, स्टॉक आणि स्पोर्ट्सची माहिती देण्यासाठी, मेटा कंपनी सध्या Google आणि Binge शोध इंजिनच्या माहितीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत, नवीन एआय शोध इंजिनमुळं गुगलवरील अवलंबित्व कमी करण्याचा मेटाचा प्रयत्न असेल.
एआयचा वापर वाढला : सध्याच्या साधनांमध्येही एआयचा वापर वाढला आहे. मेटाच्या धर्तीवर, इतर कंपन्यांनी AI ला त्यांच्या विद्यमान टूल्स आणि सेवांमध्ये समाकलित केलं आहे. Google सतत त्याच्या नवीनतम आणि शक्तिशाली AI मॉडेलचा शोध ते ईमेल पर्यंतच्या सेवांमध्ये वापर करत आहे.
हे वाचलंत का :