ETV Bharat / state

मुंबईत दररोज ५० हजारापेक्षा जास्त परप्रांतीय मजूर होत आहेत दाखल

author img

By

Published : May 7, 2021, 7:48 PM IST

Updated : May 7, 2021, 8:08 PM IST

हाताला काम आणि पोटाला भाकरी नसल्याने गावी गेलेले मुंबईतील परप्रांतीय मजूर आता पुन्हा मोठ्या संख्येने मुंबईत परतू लागले आहेत. मुंबईत कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर परतीच्या मार्गावर आहे.

mumbai migrant labour news
मुंबईत दररोज ५० हजारापेक्षा जास्त परप्रांतीय मजूर होत आहेत दाखल

मुंबई - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर हाताला काम आणि पोटाला भाकरी नसल्याने गावी गेलेले मुंबईतील परप्रांतीय मजूर आता पुन्हा मोठ्या संख्येने मुंबईत परतू लागले आहेत. मुंबईत कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर मुंबईत परतीच्या मार्गावर आहे. प्रत्येक दिवशी ५० हजारापेक्षा जास्त परप्रांतीय श्रमिक दररोज मुंबई दाखल होत आहे.

रिपोर्ट

मुंबईकरांची डोके दुखी वाढणार -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्य शासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईत काम करणाऱ्या परप्रांतीय मजूरांनी गेल्या वर्षीप्रमाणे हाल होऊ नये म्हणून होळीनंतर गावाकडची वाट पकडली होती. त्यात गेल्या महिन्यात झालेल्या पश्चिम बंगालचा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात श्रमिक वर्ग गावाकडे गेला आहे. मात्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालसारख्या अनेक राज्यात आता कोरोना रुग्णाची संख्या वाढत जात आहे. त्यामुळे त्या-त्या राज्य सरकारने आता निर्बंध लावले आहेत. त्यामुळे तेथे उदर्निवाहाची साधने बंद असल्याने सोबतच मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर मुंबईत परतू लागले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व प्रवाशांची कोरोना चाचणीविना मुंबईत दाखल होत असल्याने मुंबईकरांची डोकेदुखी वाढणार आहे.

दररोज ५५ गाड्या दाखल -

मध्य आणि पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, राज्याअंतर्गत धावणाऱ्या गाड्या कमी प्रतिसादामुळे रद्द करण्यात येत असल्या तरी, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून येणाऱ्या गाड्यांची वाढत आहे. दररोज विशेष रेल्वे गाड्यासह नियमित गाड्या मिळून मुंबईत दररोज ५५ गाड्या दाखल होत आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये ६० ते ७५ टक्के क्षमते या गाड्या मुंबईत दाखल होत आहे. मध्य रेल्वेवर ३२ हजार, तर पश्चिम १८ हजार असे एकूण ५० हजार प्रवासी दररोज मुंबईत दाखल होत आहे. तर काही रस्ते मार्गानी मुंबईत दाखल होत आहे.

५५ लाख कामगार -

मुंबईतील कोरोना रुग्णदुपट्टीचा कालावधी १२३ दिवसांपर्यंत पोहोचला आहे. तसेच शासनाच्या कडक निर्बंधामुळे मुंबईतील कोरोना नियंत्रणात आलेला आहे. तसेच खबरदारी म्हणून मुंबईसह राज्यात रस्ते-रेल्वेमार्गे येणाऱ्या परप्रांतीय मजुरांची नोंदणी करून त्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी, असे सरकारचे स्पष्ट आदेश आहे. मात्र, व्यापक पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने आज बाहेर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोविड चाचणी होताना दिसून येत नाही आहे.

हेही वाचा - मोदी सरकारला लोकांबद्दल सहानुभूती नाही-सोनिया गांधींची टीका

Last Updated : May 7, 2021, 8:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.