मुंबई - दहिसरच्या आनंद नगर भागातील जैन मंदिरातील मुर्त्यांच्या डोक्यावरील चांदिचे मुकुट व रोकड अज्ञात चोरट्यांनी पळविले होते. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत केवळ बारा तासांतच गुन्ह्याचा छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंदिराच्या सुरक्षा रक्षकालाच बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद नगर येथे असलेल्या जैन मंदिरात एक सुरक्षा रक्षक मागील बारा वर्षापासून आपले कर्तव्य चोखपणे बजावत होता. मात्र, मंदिरातील तीन मुकुट व चार लाखांची रोकड चोरीला गेल्यापासून तो गायब होता. त्यामुळे पोलिसांचा त्यावर संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी पुरण खडक (वय 28 वर्षे), याचा शोध सुरू केला. तांत्रिक गोष्टीच्या आधारे पोलिसांनी मंदिराचा सुरक्षा रक्षक व अन्य एक जण अशा दोघांना पुणे जिल्ह्यातून अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमालही जप्त केला आहे. हा गुन्हा केवळ बारा तासांतच पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
हेही वाचा - मनसुख हिरेन प्रकरणाचे गुढ वाढले; हिरेन यांच्या मृत्यू ठिकाणी आढळला आणखी एक मृतदेह