मुंबई Dahi Handi 2023 : दहीहंडी उत्सवादरम्यान महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या, पादचाऱ्यांवर रंगीत पाण्याचे फुगे फेकणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी कारवाईसाठी कडक पावलं उचलली आहेत. साध्या वेशातील पोलीस अधिकारी अशा घटनांवर कडी नजर ठेऊन असणार आहे.(Krishna Janmashtami 2023)
पाणी फेकण्यास बंदी : दहीहंडी उत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी पाणी फेकणं तसंच अश्लील हावभावामुळं जातीय तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळं पोलिसांनी सुरक्षेच्या हितासाठी कठोर पावलं उचलीली आहेत. पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर, ऑपरेशन विभाग, मुंबई यांनी आक्षेपार्ह भाषा, शाब्दिक शिवीगाळ, सार्वजनिक ठिकाणी पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, स्प्रे पेंट किंवा पावडर फेकण्यास बंदी घालणारा आदेश जारी केला आहे.(Dahi Handi Festival)
नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई : या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. गोविंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहभागींनी या नियमांचे पालन करावे. दहीहंडी उत्सव साजरा करताना सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. उत्सवादरम्यान पोलीस अधिकारी सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी गर्दीत मिसळतील.
महिलांच्या सुरक्षेवर विशेष भर : मुंबईत आज, उद्या दहीहंडी उत्सव साजरा होणार असून, महिलांच्या सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशातील पोलीस अधिकारी गर्दीत उपस्थित राहणार आहे. यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जो कोणी अश्लील गाण्यांवर नाचेल, हातवारे करेल त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असं पोलीस आदेशात नमूद केले आहे.
पोलीस बंदोबस्त तैनात : सुरक्षेच्या दृष्टीनं दहीहंडीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून शहरातील सुमारे पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीनं हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत. याशिवाय, केंद्रीय राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण दल, राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), जलद कृती दल, फोर्स वन, बॉम्ब शोधक पथक यासारखी विविध विशेष दले, तसेच मुंबई पोलिसांचे अधिकारी उपस्थित असतील.
हेही वाचा -