मुंबई : संजय राऊत यांच्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर अटकेची (Kishori Pednekar Arrest Possible) टांगती तलवार आहे. एसआरए घोटाळ्याप्रकरणी (SRA Scam Mumbai ) भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आरोप (Kirit Somayya Allegation Kishori Pednekar) केल्यानंतर दादर पोलिसांनी आज अर्धा तास किशोरी पेडणेकर यांची चौकशी (Kishori Pednekar Enquires) केली. याबाबत जूनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला होता. (Latest news from Mumbai)
![किरीट सोमय्या यांनी केलेली तक्रार कॉपी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-dadarpoliceenquireswithexmayorkishoripednekarinsrascam_28102022212158_2810f_1666972318_914.jpeg)
फ्लॅट मिळवून देण्यासाठी पैशाची मागणी- या एफआयआरमध्ये किशोरी पेडणेकर यांचे नाव नव्हते. मात्र, याप्रकरणी चौकशीअंती ४ जणांना अटक करण्यात आली. ज्यात एक आरोपी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा शेजारी आणि जवळची आहे. तर एक बीएमसीचा कर्मचारी आहे. या दोघांनी आपल्या जबाबात माजी महापौरांचे नाव घेतले आहे. एसआरए फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे घेतल्याची तक्रार एकूण 9 जणांनी केली. पण फ्लॅट मिळाला नाही. 9 जणांकडून घेतलेल्या पैशांपैकी काही हिस्सा किशोरी पेडणेकर यांच्याकडेही गेल्याचा दावा महापौरांची नावे सांगणाऱ्या दोघांनी केला आहे. त्यामुळेच आज पहिल्यांदा किशोरी पेडणेकर यांना बोलावून पोलिसांकडून विचारपूस करण्यात आली. उद्या सकाळी देखील दादर पोलिसांनी पेडणेकर यांना चौकशीला बोलावले आहे.
काय आहे प्रकरण - मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या किश कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने वरळी येथील गोमाता जनता एसआरएमध्ये काही गाळे हडप केले. काही गाळे बेनामी हस्तकत केले. यासंबंधी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्याकडे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली आहे. किशोरी पेडणेकर यांनी 2017 महापालिका निवडणूक नामांकन पत्रात त्यांचे रहिवासी ठिकाण म्हणून वरळी गोमाता जनता एसआरएच्या सहाव्या मजल्याच्या सदनिकेचा पत्ता दिला होता. तर किशोरी पेडणेकर किश कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेडच्या मालक आणि प्रमोटर आहेत. त्यांनी या कंपनीची रचना करताना या कंपनीचा रजिस्टर ऑफ कार्यालय म्हणून हा पत्ता रजिस्टर ऑफ कंपनी भारत सरकारकडे गोमाता जनता एसआरए प्रकल्पातील तळमजल्यातील दोन काळे दर्शवले होते. जे लाभार्थी होते म्हणजे त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या यादी पेडणेकर परिवाराचे नाव नाही. लाभार्थी नसताना देखील किशोरी पेडणेकर अशा प्रकारे वरळी गोमाता जनता एसआरएचे अनेक गाळे आपल्या ताब्यात घेतले आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
सतीश लोखंडे यांची मागणी- या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांना पत्र लिहिले असून त्या प्रकरणाची चौकशी करून किशोरी पेडणेकर आणि किश कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेडला नोटीस द्यावी आणि हे गाळे ताब्यात घ्यावे अशी विनंती सतीश लोखंडे यांना केली आहे.