मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्याप्रमाणे आज सकाळी सात वाजल्यापासून देशातील नागरिक जनता कर्फ्यूचे पालन करताना दिसत आहेत. मुंबईतील मध्यवर्ती परिसरातील दादर फुलबाजार पूर्णतः ठप्प झाला आहे.
हेही वाचा - पंतप्रधानांच्या आवाहनानंतर आज देशभर 'जनता कर्फ्यू'..
दादर स्टेशनच्या पश्चिम बाजूला दररोज मोठ्या प्रमाणात फुलांचा बाजार भरतो. या ठिकाणी राज्यातून आणि परराज्यातून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होते. त्याचबरोबर खरेदी-विक्री देखील होते. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर या परिसरामध्ये संपूर्णतः संचारबंदी ठेवण्यात आली आहे. नागरिक तुरळक वर्दळ या ठिकाणी दिसून आली. मात्र, व्यापारी आणि दुकानदारांनी जनता कर्फ्यूमध्ये सहभाग घेतला आहे. दादर रेल्वे स्थानकातून सातत्याने उद्घोषणा केल्या जात असून नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन देखील केले जात आहे.