मुंबई - आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती हा आमचा मोठ विजय असल्याचे वक्तव्य आरेचे याचिकाकर्ते व वनशक्तीचे अध्यक्ष डी. स्टॅलिन यांनी केले. 2014 पासून मेट्रो कारशेड दुसरीकडे स्थलांतर करण्यासाठी आमचा लढा सुरू असल्याचे स्टॅलिन म्हणाले.
आरे मेट्रो कारशेडच्या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगीती दिली आहे. रातोरात झाडांची कत्तल केलेले मला मान्य नाही. मी आरेतील एकाही झाडाच्या पानाला हात लावू देणार नसल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. या त्यांच्या निर्णयानंतर डी. स्टॅलिन यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत.
हा सत्याचा लढा होता, तो आज आम्ही जिंकला आहे. आरेतील मेट्रो कारशेड स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईला मेट्रोही मिळेल आणि आरेच जंगलही अबाधित राहील असेही स्टॅलिन म्हणाले.