ETV Bharat / state

इमारतीमध्ये सिलेंडरचा स्फोट, जीवितहानी नाही - fire in building

'डिंपी ओरिजेन' या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एक सदनिकेत हा सिलेंडरचा स्फोट झाला. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले. सेक्टर १४, १५, १७ आणि २० मध्येदेखील या स्फोटाची तीव्रता जाणवली. या स्फोटानंतर इमारतींमधील सर्व रहिवाशी रस्त्यावर आले होते.

cylinder blast
'डिंपी ओरिजेन' या इमारतीत सिलेंडरचा स्फोट
author img

By

Published : Jan 22, 2020, 11:55 PM IST

नवी मुंबई - कळंबोली परिसरातील रोडपाली येथील सेक्टर १६ मधील 'डिंपी ओरिजेन' या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर बुधवारी सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे इमारत परिसर हादरला.

इमारतीमध्ये सिलेंडरचा स्फोट, जीवितहानी नाही

हेही वाचा - बुधवार ठरला अपघातवार; २ अपघातात तिघे ठार

'डिंपी ओरिजेन' या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एक सदनिकेत हा सिलेंडरचा स्फोट झाला. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले. सेक्टर १४, १५, १७ आणि २० मध्येदेखील या स्फोटाची तीव्रता जाणवली. या स्फोटानंतर इमारतींमधील सर्व रहिवाशी रस्त्यावर आले होते.

हेही वाचा - 'एलआयसी'कडूनही विश्वासघात; मुंबईत पॉलिसी धारकाची लाखोंची फसवणूक

घटनेची माहिती मिळताच सिडकोच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. काही तासांच्या प्रयत्नानंतर त्यांनी आग आटोक्यात आणली. दरम्यान, इमारत परिसरातील रस्त्यावर मोठया संख्येने बघ्यांची गर्दी झाली होती. कळंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील गर्दी पांगवली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली, तरी वित्त हानी मोठया प्रमाणावर झाली आहे.

Intro:

कळंबोलीमध्ये गॅसचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी नाही..
नागरिकांत घाबराट

नवी मुंबई:

कळंबोली परिसरातील रोडपाली येथील सेक्टर 16 मधील डिंपी ओरिजेन या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर आज बुधवारी सिलेंडरचा स्फोट झाला असून इमारत परिसर हादरला आहे व परिसरात मोठया प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले आहे.
कळंबोली परिसरातील रोडपाली परिसरातील डी मार्ट ते नवी मुंबई पोलीस मुख्यालय मार्गावर सेक्टर 16 मध्ये कृष्णा बार अँड रेस्टॉरंट समोर भूखंड क्रमांक 20 येथे डिंप ओरिजेन ही इमारत आहे.बुधवारी रात्री तिसऱ्या मजल्यावरील एक सदनिकेत सिलेंडरचा स्फोट झाला.स्फोटाची तीव्रता इतकी होती की, परिसरातील सेक्टर 14,15,17 आणि 20 मध्ये मोठ्या प्रमाणात आवाज आला त्यामुळे इमारतीतील सर्व घरांमधील रहिवासी रस्त्यावर आले होते. स्फोटामुळे तिसऱ्या मजल्यावरील घराला आग लागली असून संसार उपयोगी सामानही जळून गेले आहे.या घटनेची माहिती मिळताच सिडकोच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले, व त्यांनी ही आग आटोक्यात आणली आहे. दरम्यान इमारत परिसरातील रस्त्यावर मोठया प्रमाणात बघ्यांची गर्दी होती.कळंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील गर्दी पांगवली.सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी वित्तीय हानी मोठया प्रमाणावर झाली आहे.
Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.