मुंबई: अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनार्याजवळ आज वेगाने धडकण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून चक्रीवादळाने तीव्र स्वरुप धारण केले आहे. या चक्रीवादळामुळे मुंबई शहरासह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईत गेट ऑफ इंडियाजवळ समुद्र खवळलेला दिसत आहे. आज सकाळी साडेदहा भरतीचे अधिक स्वरुप दिसणार आहे, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मुंबईला 145 किमी लांबीचा किनारा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेडून समुद्रकिनारी 120 प्रशिक्षित सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहे. पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांमध्ये समुद्रकिनारी सुरक्षारक्षक हे सकाळी ८ ते रात्री ११ वाजता कार्यरत असणार आहेत. गिरगाव आणि दादर समुद्रकिनाऱ्यावर सकाळी 8 ते 4 या वेळेत सुरक्षा रक्षक तैनात असणार आहेत. तर पश्चिम उपनगरातील जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई समुद्रकिनाऱ्यांवर दुपारी 3 ते 11 या वेळेत सुरक्षा रक्षक कार्यरत असणार आहेत. सोमवारी पश्चिम उपनगरातील जुहू कोळीवाडा येथे 12 ते 15 वयोगटातील पाच मुले समुद्रात वाहून गेले होते. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून एकाला वाचविण्यात यश आले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून समुद्रकिनारी लोकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येत आहे.
-
#WATCH | Maharashtra: Rough seas at Gateway of India as #CycloneBiparjoy is excepted to make landfall in Gujarat. High tide is expected in Mumbai at 10.29 am. pic.twitter.com/94JLND5Awr
— ANI (@ANI) June 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Maharashtra: Rough seas at Gateway of India as #CycloneBiparjoy is excepted to make landfall in Gujarat. High tide is expected in Mumbai at 10.29 am. pic.twitter.com/94JLND5Awr
— ANI (@ANI) June 15, 2023#WATCH | Maharashtra: Rough seas at Gateway of India as #CycloneBiparjoy is excepted to make landfall in Gujarat. High tide is expected in Mumbai at 10.29 am. pic.twitter.com/94JLND5Awr
— ANI (@ANI) June 15, 2023
पश्चिम रेल्वेकडून आणखी 7 गाड्या रद्द : चक्रीवादळाचा रेल्वे सेवेलाही फटका बसणार आहे. पश्चिम रेल्वेने आणखी 7 गाड्या रद्द केल्या आहेत. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व खबरदारी म्हणून पश्चिम रेल्वेने (डब्ल्यूआर) बुधवारी हा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि रेल्वे कामकाजाला फटका बसू नये, या दृष्टीने आणखी सात रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्मिम रेल्वेने आतापर्यंत ७६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे रद्द झाल्याने नुकसान झालेल्या प्रवाशांना तिकिटाची रक्कम परत मिळणार आहे.
आयएनएस हंसा गोव्यात आणि आयएनएस शिक्रा मुंबईत तैनात: चक्रीवादळ आज धडकणार असल्याने गुजरातमधील पोरबंदर आणि ओखा येथे प्रत्येकी पाच मदत पथके तैनात करण्यात आली आहेत. वालसुरा येथे 15 मदत पथके स्थानिक जिल्हा प्रशासनाला मदत करण्यासाठी सज्ज आहेत. गोव्यातील आयएनएस हंसा आणि मुंबईतील आयएनएस शिक्रा येथील हेलोस गुजरातला जाण्यासाठी सज्ज करण्यात आल्या आहेत. पी8आय (P8I) आणि डॉर्नियर विमाने स्टँडबाय मोडवर आहेत.
हेही वाचा-
- Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळ आज धडकणार गुजरातमध्ये, भारतीय नौदलासह आपत्ती व्यवस्थापन जवान सज्ज
- cyclone Biparjoy: बिपोरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढली, गेट वे परिसरात उसळल्या तुफान लाटा
- Cyclone Biparjoy Updates: गुजरातच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या चक्रीवादळाचा वाढला धोका; सुरक्षेसाठी कांडला बंदरासह १९ रेल्वे बंद