ETV Bharat / state

लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियाचा गैरवापर, सायबर विभागाकडून 366 गुन्हे दाखल - सायबर विभागाकडून 366 गुन्हे दाखल

लॉकडाऊनच्या काळात काही गुन्हेगार व समाजकंटक व्हाट्सअ‌ॅप, फेसबुक व टिकटॉकसारख्या माध्यमांचा गैरवापर करत आहेत. आक्षेपार्ह मजकूर पसरवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर कारवाई करत राज्यात 366 गुन्हे दाखल केले आहेत.

r misuse of social media
लॉकडाऊनच्या काळात सोशल माध्यमांचा गैरवापर
author img

By

Published : May 10, 2020, 4:16 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या काळात काही गुन्हेगार व समाजकंटक व्हाट्सअ‌ॅप, फेसबुक व टिकटॉकसारख्या माध्यमांचा गैरवापर करत आहेत. आक्षेपार्ह मजकूर पसरवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर कारवाई करत राज्यात 366 गुन्हे दाखल केले आहेत.

राज्यात सर्वाधिक गुन्हे बीड जिल्ह्यात 35 असून पुणे ग्रामीण 29 , मुंबई 21, कोल्हापूर 16, जळगाव 26, सांगली 14, नाशिक ग्रामीण 15, नाशिक शहर 11, जालना 12, सातारा 10, नांदेड 10, परभणी 8, ठाणे शहर 13 सिंधुदुर्ग 7, नागपूर शहर 7, नवी मुंबई 8, सोलापूर ग्रामीण 5, लातूर 10, बुलडाणा 6, ठाणे ग्रामीण 6, अमरावती ४, पुणे शहर 4, गोंदिया 5, सोलापूर शहर 4, हिंगोली 6, रायगड 2, वाशिम 2, धुळे 2, औरंगाबाद 1 यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

आक्षेपार्ह व्हाट्सअ‌ॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी 155 गुन्हे दाखल झाले आहेत. तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी 143 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी 16 गुन्हे दाखल झाले आहेत. तर ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी 6 गुन्हे दाखल झाले आहेत. ऑडिओ क्लिप्स, यू-ट्यूबचा गैरवापर केल्या प्रकरणी 42 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 198 आरोपींना अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.