ETV Bharat / state

Gold smuggling: दुबईतून आलेल्या 8 प्रवाशांकडून 3.2 कोटींचे सोने जप्त; मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई - branded watches

छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत 6 किलो वजनी सोनं जप्त केले. तसेच 3 ब्रँडेड घड्याळही अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत. दुबईहून आलेल्या 8 भारतीय प्रवाशांवर कारवाई करत सीमा शुल्क विभागाने 3.2 कोटी रुपयांचे सोने जप्त केले.

8 प्रवाशांकडून 3.2 कोटींचे सोने जप्त
8 प्रवाशांकडून 3.2 कोटींचे सोने जप्त
author img

By

Published : Aug 20, 2023, 11:09 AM IST

मुंबई : येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने 8 प्रवाशांवर कारवाई करत सोने आणि ब्रँडेड घड्याळं जप्त केली आहेत. कारवाई करण्यात आलेल्या 8 प्रवाशांकडून 3.2 कोटी रुपयांचं 6 किलो वजनी सोनं आणि 3 ब्रँडेड घड्याळं जप्त केली आहेत. दरम्यान या प्रवाशांना अटक करण्यात आलीय.

सर्व भारतीय : सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरम्यान सीमा शुल्क विभागानं शुक्रवार आणि शनिवारी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत सोनं जप्त केले. या दोन दिवशी सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर 8 जणांकडून 3.2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचं 6.19 किलो वजनी सोनं जप्त केलं. तसेच 3 ब्रँडेड घड्याळंदेखील जप्त केलीत. सीमा शुल्क विभागानं 8 प्रवाशांना अटक केलीय. अटकेत असलेले सर्व प्रवाशी हे भारतीय नागरिक आहेत. हे सर्व प्रवाशी आंतरराष्ट्रीय विमानातून छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळावर उतरले होते.

पहिली आणि दुसरी कारवाई : पहिल्या घटनेत मुंबई विमानतळावर केरळचा रहिवासी पकडला गेला. तो एका विमानाने दुबईहून मुंबईला आला होता. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर त्याला अडवण्यात आलं. अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याकडून 54 लाख रुपये किंमतीचे 3 ब्रँडेड घड्याळं आणि 10.80 ग्रॅम वजनाचे 18 कॅरेट सोन्याचे हुक मिळाले. हे हुक त्याने आपल्या कपड्यात लपवले होते. दुसऱ्या कारवाईतील प्रवाशी हा कोल्हापूरचा रहिवासी आहे. त्याने 2 किलो 250 ग्रॅम वजनाची सोन्याची पावडर 2 पाऊचमध्ये लपवली होती. या पाऊचमध्ये ठेवलेल्या मेणात त्याने 24 कॅरेट सोन्याची पावडर लपवून ठेवली होती. त्याने या दोन्ही पाऊच आपल्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवल्या होत्या. तर तिसऱ्या कारवाईत दुबईहून परतणारे प्रवाशी हे रायगड, केरळ आणि हरियाणातील आहेत. या प्रवाशांची तपासणी केली असता या 3 प्रवाशांकडून अनुक्रमे 1 किलो 570 ग्रॅम, 289 ग्रॅम आणि 239 ग्रॅम सोनं सापडलं. हे सोनं त्यांनी त्यांच्या पायघोळ, बूट आणि शरीरात लपवून ठेवलं होतं.

सोने तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस : काही दिवसांपूर्वी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2.1कोटी रुपयांचे 3.35 किलो सोने जप्त केलं होतं. या प्रकरणात 11 जणांना अटक करण्यात आलीय.

हेही वाचा-

  1. Gold Found In Gadmudshingi : तलावाकाठी खेळणाऱ्या मुलांना सापडले तब्बल 24 लाखाचे सोने
  2. Gold Smuggling : आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई! सुरत विमानतळावर तब्बल 48 किलो सोन्याची पेस्ट जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.