ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष: जेएनपीटीत येणाऱ्या चीनी कंटेनरची कस्टम क्लियरिंग लांबणीवर... - भारत चीन वाद

सध्याच्या परिस्थितीत चीनमधून आलेल्या फार्मसिटीकल्स, मॅन्युफॅक्चरिंग, रसायन, खत व इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंचा माल कस्टम क्लियरिंगमधून कधी बाहेर येणार याबद्दल अद्याप कुठलीही माहिती कस्टम विभागाकडून देण्यात आली नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचे विजय वरपे, व जिगर कोठारी या कस्टम क्लियरिंग एजंटने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

custom-clearing-of-chinese-containers-arriving-at-jnpt-delayed-in-mumbai
जेएनपीटीत येणाऱ्या चीनी कंटेनरची कस्टम क्लियरिंग लांबणीवर...
author img

By

Published : Jul 1, 2020, 6:22 PM IST

मुंबई- भारत-चीन सीमाप्रश्न सध्या तापला आहे. त्यातच भारताने चीनला डिजिटल सर्जिकल स्ट्राईककरुन दणका दिला आहे. तसचे मुंबईजवळील जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) बंदरावर येणाऱ्या चीनमधील कंटेनरच्या क्लियरिंग कामाला स्थगिती दिली आहे. न्हावाशीवा येथील जेएनपीटीमध्ये दाखल होणाऱ्या चीन वगळता इतर देशातील मालाला कस्टमकडून पास केले जात आहे.

जेएनपीटीत येणाऱ्या चीनी कंटेनरची कस्टम क्लियरिंग लांबणीवर...

परदेशातून मोठ्या प्रमाणातून माल घेऊन जेएनपीटी बंदरावर कंटेनर येतात. मात्र, यातील चीनमधल्या कंटेनरच्या कस्टम क्लियरिंगचे काम काही वेळासाठी थांबविण्यात आल्याचे समोर आले आहे. सध्या भारत चीन दरम्यान सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काम थांबवण्यात आले आहे. केंद्र सरकारने भारत चीन सीमा वादानंतर कडक धोरण अवलंबले आहे.

चीनमधून आलेल्या कंटेनर जहाजांना जेएनपीटी बंदरात येऊ दिले जात नाही. यामुळे जेएनपीटीमधील कस्टम क्लियरिंगचे काम करणाऱ्या कंपनीचे आर्थिक नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे. जेएनपिटीत सध्या 2 हजारांहून अधिक कस्टम हाऊस क्लियरिंग एजन्सी काम करीत आहेत. प्रत्येक क्लियरिंग एजन्सीकडे चीनमधील कमीत-कमी 10 कंटेनर कस्टम क्लियरिंगसाठी आले आहेत. या क्लियरिंग एजन्सीचा इतर कंपन्यांसोबत करार झालेला आहे. त्यानुसार जेएनपीटी बंदरात जहाजातून आलेल्या कंटेनरमधील माल 2 ते 3 दिवसात कस्टमच्या सर्व अटी पार केल्यानंतर बाहेर काढला जातो.

सध्याच्या परिस्थितीत चीनमधून आलेल्या फार्मसिटीकल्स, मॅन्युफॅक्चरिंग, रसायन, खत व इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंचा माल कस्टम क्लियरिंगमधून कधी बाहेर येणार याबद्दल अद्याप कुठलीही माहिती कस्टम विभागाकडून देण्यात आली नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचे विजय वरपे, व जिगर कोठारी या कस्टम क्लियरिंग एजंटने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

देशातील सर्वात मोठे पोर्ट, अर्ध्या मनुष्यबळात करतंय काम...
जवाहरलाल नेहरू पोर्ट, ट्रस्टमधून भारताला समुद्राच्या मार्गाने होणाऱ्या 55 टक्के कंटेनर मालाची हाताळणी करते. देशातील पाहिल्या क्रमांकाचे असलेले हे पोर्ट दरवर्षी जवळपास 40 लाखांहून अधिक कंटेनरची ने-आण करीत आहे. कोरोना व्हायरसचे संकट लक्षात घेता काही प्रमाणात जेएनपीटी येथील कस्टम मनुष्यबळावर याचा परिणाम झाला असल्याचेही समोर येत आहे. सध्याच्या परिस्थितीत जेएनपीटी कस्टम विभागातील मनुष्यबळ प्रत्येक दिवशी 50 टक्के ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उपलब्ध मनुष्यबळावर कस्टम क्लियरिंगमधील नोटिंग, ड्युटी पेमेंट, व पासिंग सारखी कामे केली जात आहेत.

चीनमधून आलेल्या कंटेनर विषयी अधिकाऱ्यांचा बोलण्यास नकार..
भारतात कोचीन, चेन्नई, व मुंबई सारख्या पोर्टमध्ये परदेशातून कंटेनरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्राशी निगडित माल येतो. या तीनही पोर्टपैकी मुंबईजवळील न्हावाशेवा येथील जेएनपीटी हे सर्वाधिक कंटेनर हाताळत आहे. मात्र, परदेशातून आलेल्या कंटेनरच्या बाबतीतील सर्व कस्टम कराचा भरणा करुनही कस्टम क्लियरिंगच्या बाबतीत उशीर होत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील निगडित व्यावसायिकांचे तेवढेच आर्थिक नुकसान होत आहे. या संदर्भात मुंबई कस्टम विभाग 2 मधील संबंधित काही अधिकाऱ्यांसोबत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, चीनमधून आलेल्या कंटेनर विषयी सविस्तर माहिती ही दिल्लीतील मुख्यालयातूनच देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.