मुंबई: येथील वाय बी सेंटर येथे स्वराज्य पक्षाचा पहिला वर्धापन दिन रविवारी संपन्न झाला. (Shinde Fadnavis Govt) वर्धापन दिनानिमित्त स्वराज्य पक्षप्रमुख संभाजी राजे यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर सत्ताधारी आणि विरोधकांवर (Ajit Pawar) ताशेरे ओढले आहे. मला खालच्या थरातील राजकारण जमत नसून मला कोणावर वैयक्तिक टीका करायची नाही. 2019 साली वेगवेगळे लढले आणि सकाळी शपथविधी झाला. (State Politics) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेवर कायम खालच्या पातळीवर टीका केली. तरी देखील तिघे एकत्र आले. (Dirty Politics) सत्तेत राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी, सत्तेत शिवसेना विरोधात शिवसेना, यापूर्वी मुख्यमंत्री शिवसेनेचा आता देखील मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. नेमकं राज्यातील राजकारण कशा प्रकारचे बदल सुरू आहेत. यामुळे अमेरिकेतील लोकही गोंधळून गेले असल्याचे संभाजी राजे (Sambhaji Raje Bhosale) म्हणाले.
सिंचन घोटाळा करणाऱ्यांना सोबत घेता: भाजपा फोडा आणि राज्य करा, आम्ही मजा बघु अशा भूमिकेत आहे. सिंचन घोटाळा करणाऱ्यांना सोबत घेता. याबाबत उत्तर द्यावे लागेल. त्याकरिता आपण एका व्यासपीठावर बसू असेही संभाजी राजे यांनी आव्हान केले आहे. राजकीय लोक आपल्या सोबत खेळ करताय हे विचारण्याची वेळ आली असल्याचे म्हणत सध्या राज्यातील राजकारण गलिच्छ असल्याचा घणाघात संभाजी राजे भोसले यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर लगावला आहे.
केवळ आश्वासन देऊ नका: शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण, समाजकारण करतात. पण, त्यांच्या गड किल्ल्यांबद्दल तुम्ही काही बोलत नाही. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक कामाला सुरुवात का झाली नाही, असा थेट सवाल राज्य सरकारला विचारलाय. फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जलपूजनासाठी तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना बोलावता. अजून काम सुरू होत नाही. आता म्हणतात पुतळा उभारण्यासाठी टेक्निकल अडचण येत आहे. मग इतकी का घाई केली. खरंतर तुमच्या अश्या प्रकारामुळे गुन्हा दाखल करायला हवा होता. राज्यातील रायगड किल्ला मॉडल प्रमाणे इतर किल्ल्याबाबत का सरकार काम करत नाही? मराठा आरक्षण बाबत काय झालं, गरीब मराठा समाजावर अन्याय होत आहे. केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार आहे ना. मग मराठा सामाज्याला सामाजिक मागासलेपण सिद्ध करा, असे संभाजीराजे भोसले यांनी सरकारला आवाहन केले.
हिंदुत्व आणि राजकीय युती? राज्यातील राजकारणामुळे जगात राज्याची बदनामी चालू आहे. लोकसभेच्या निवडणुकीचे गणित जुळण्यासाठीच हे सर्व एकत्र आले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 मंत्री परत जातील असा विश्वास मला आहे. मी शरद पवारांवर बोलणार नाही. ते माझ्यासाठी ज्येष्ठ आहेत. मी बोलणार नाही कारण आमचे संस्कार तसे नाही. अशा प्रकारची लोकशाही राज्य पाहायला मिळत आहे. सगळं काही ठरवून सुरू असून अजित पवार मुख्यमंत्री होणार नाही, असा दावा संभाजी राजे भोसले यांनी केला आहे.
आमच्या नादाला लागू नका: आपण दोन टक्के छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखे स्वराज्य निर्माण करण्याचे काम केले. तरी जीवनाचे सार्थक होईल. गलिच्छ राजकारण चालू असून हे जनतेपर्यंत सांगायचे काम करायचे आहे. माझे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी संबंध आहे. मी त्यांची काल भेट घेतली. मला कोणावरही वैयक्तिक टीका करायची वेळ आणू नका. माझ्या नादाला लागू नका, आम्हाला डिवचलं तर आम्ही बांगड्या भरल्या नाही, असा सज्जड दम छत्रपती संभाजी राजे यांनी राजकीय टीकाकारांना भरला.
हेही वाचा: