मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 89 वर पोहोचली आहे. रविवारी नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्युचे आवाहन केले होते त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, आज (सोमवारी) नागरिक पुन्हा रस्त्यावर उतरल्याचे चित्र मुंबईत दिसून येत होते. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी दुपारी नागरिकांनी दुकानाबाहेर गर्दी केली होती.
कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. तर शहरातील चुनाभट्टी येथील एका दुकानात सामान विकत घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या दुकानात सामान विकत घेण्यासाठी फक्त एक वेळी 5 जणांनाच सोडण्यात येत होते. तर अनेक ठिकाणी होणारी गर्दी पाहता सोमवारी राज्यात कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा - #CORONAVIRUS : इटलीतील स्थिती सांगतोय मराठी तरुण...याची देही, याची डोळा