मुंबई - महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि. 10 एप्रिल) बैठक बोलावली आहे. कोरोनाला आळा बसवण्यासाठी कठोर निर्बंधाची घोषणा होऊ शकते, असा इशारा मुख्यमंत्री यांनी दिला होता. मुख्यमंत्री याच्या इशाऱ्यानंतर पुन्हा राज्यात लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत मुंबईतील लोकमान्य टिळक स्थानकात परप्रांतीयांनी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सर्व ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले. त्यामध्ये आमच्या नोकऱ्या गेल्या. तसेच आमचे दुकाने ही बंद ठेवण्यात आले आहे. हे असेच चालत राहिले तर आम्हला येथे खाण्यासाठी ही पैसे राहणार नाहीत म्हणून आम्ही गावी जात आहोत, असे काही परप्रांतीयांकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल
हेही वाचा - वीकेंड लॉकडाऊनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; मुंबईतील मेट्रो स्थानकावर शुकशुकाट