ETV Bharat / state

Mahashivratri : साडेतीनशे वर्ष जुन्या असलेल्या बाबुलनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी - Crowd of devotees on occasion of Mahashivratri

गिरगाव चौपाटीच्या काही अंतरावर आणि मलबार हिल येथे वसलेल्या साडेतीनशे वर्षे जुने पुरातन असे शिवमंदिर म्हणजेच बाबुलनाथ. या बाबुलनाथ मंदिरात आज श्री महाशिवरात्री निमित्त भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे. मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हा बाबुलनाथ मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी आल्याचे दिसून येत आहे.

Mahashivratri
महाशिवरात्री
author img

By

Published : Feb 18, 2023, 8:15 PM IST

प्रतिक्रिया देतांना बाबुलनाथ मंदिराचे ट्रस्टी आणि भाविक

मुंबई : बाबुलनाथ मंदिराचे ट्रस्ट नितीन ठक्कर यांनी 'ई टीव्ही' भारतशी बोलताना सांगितले की, बाबुलनाथ हे मंदिर साडेतीनशे वर्ष जुने असून; आज महाशिवरात्री निमित्त पाच साडेपाच लाख भाविक महादेवाच्या दर्शनासाठी आले असल्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने आम्ही भाविकांसाठी अभिषेक करण्यासाठी पाण्याची सोय केलेली असून; अतिशय व्यवस्थित पद्धतीने भाविकांचे दर्शन होईल याची काळजी घेतली जात आहे. महाशिवरात्री प्रमाणे श्रावणी सोमवार या दिवशी देखील बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते.

नवस पुर्ण करणारा बाबुलनाथ : नवस पूर्ण झाल्यावर नवस पूर्तीसाठी अनेक भाविक नारळ, पेढे, सोन्या-चांदीच्या वस्तू अर्पण करतात. तसेच ढोपरांवर चालत येऊन दर्शन घेतात. मात्र बाबुलनाथ मंदिरात एक अशी महिला भेटली. ज्या महिलेला मूल होत नाही म्हणून, तिने बाबुलनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारांपासून पायऱ्या चढून महादेवाचे दर्शन घेण्याचे ठरवले. ह्या महिलेने 'ई टीव्ही' भारतशी बोलताना सांगितले की, मला मूल होत नाही म्हणून मी ढोपरांवर चालत महादेवाचे दर्शन घेणार आणि मूल व्हावं यासाठी नवस करणार असल्याचे तिने सांगितले. या महिलेचे नाव संजना असून; त्या भायखळा येथून बाबुलनाथ मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी आल्या होत्या.

कसे पडले बाबुलनाथ नाव : बाबुलनाथ मंदिरामध्ये असलेले शिवलिंग बाभळीच्या झाडाच्या सावलीत सापडले होते. त्यामुळे या मंदिराला बाबुलनाथ हे नाव ठेवले गेले असे म्हटले जाते. 1840 सालमध्ये या मंदिरात भगवान शिवच्या कुटुंबातील सदस्यांकडून मूर्ती बसविण्यात आली होती. त्याचप्रमाणे कांदिवली येथून आलेल्या काही युवकांनी आज सकाळी सहा वाजल्यापासून बाबुनाथ मंदिरात आलेल्या भाविकांसाठी मोफत थंडाईचे वाटप ठेवले होते. गेली चार ते पाच वर्ष हे युवक भाविकांना मोफत थंडाई वाटपाचे काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच इतरही अनेक भाविक या दिवशी आपआपल्या ईच्छेने प्रसाद वाटप करतात.

वेबसाईटवर मिळेल मंदिराचा इतिहास : पहिल्यापासून ते आतापर्यंत अनेक भाविक इथे दर सोमवारी आणि महाशिवरात्रीला खूप मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. कोरोनाच्या काळात ऑनलाईन दर्शन भाविकांसाठी सुरू होते. महाशिवरात्री निमित्य सकाळ पासुनच भाविकांची गर्दी येथे दिसुन आली. अगदी अबाल वृध्दांपासुन ते तरुणांपर्यंत अनेक भाविक आपआपल्या श्रध्देनुसार पूजेचे साहित्य घेऊन येतात.

हेही वाचा : Mahashivratri : आज महाशिवरात्री! 27 वर्षांनंतर येणार 'असा' अद्भुत योगायोग, जाणून घ्या सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.