ETV Bharat / state

New Year 2023 Celebration : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत तुफान गर्दी; नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू

author img

By

Published : Dec 31, 2022, 10:58 PM IST

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मरीन ड्राइव्ह ( Marine Drive ) परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी ( Crowd on Marine Drive to welcome New Year ) केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी शहरातील प्रमुख ठिकाणी 11 हजार 500 हून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत. गेटवे ऑफ इंडिया, ( Gateway of India ) मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, ( Girgaon Chowpatty ) जुहू बीच, ( Juhu Beach ) वांद्रे उपनगरातील बँडस्टँड ( The bandstand ) यांसारख्या भागात पर्यटकांची मोठी गर्दी असते.

Happy New Year 2023
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत तुफान गर्दी

मुंबई - भारतासह जगभरात नववर्षाच्या स्वागताची ( welcoming New Year ) जय्यत तयारी सुरू आहे. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी लोक वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचले आहेत. काही हिल स्टेशनवर गेले आहेत तर, काही आपल्या घरी उत्सव साजरा करत आहेत. दरम्यान, जगात अशी काही ठिकाणे आहेत, जिथे भारतीय वेळेनुसार आज दुपारी 3.30 वाजल्यापासून नवीन वर्ष साजरे केले जात आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियामध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू ( New Year celebration begins ) झाले आहे. ऑकलंड, न्यूझीलंड ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे लोकांनी नवीन वर्षाचे जोरदार स्वागत केले. त्याचवेळी, भारतातही देशाच्या विविध भागांतून तसेच इंडिया गेटवर मोठ्या संख्येने लोक जमले आहेत.

हिल स्टेशनपासून मंदिरांपर्यंत लोकांची गर्दी- नवीन वर्षाचा आनंद लुटण्यासाठी अनेक जण घराबाहेर पडले आहेत. हिल स्टेशनपासून मंदिरांपर्यंत लोकांची गर्दी होत आहे. नववर्षानिमित्त होणारी गर्दी पाहता पोलीस प्रशासनानेही तयारी केली आहे. मुंबईत शहरांमध्ये मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहेत.

मुंबईतील गजबजलेल्या भागात पार्किंगला परवानगी नाही - मुंबईत नववर्षानिमित्त मोठी गर्दी होते आहे. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांकडून गर्दीच्या ठिकाणी नो पार्किंगचे आदेश जारी करण्यात आले आहेत. वरळीतील खान अब्दुल गफार खान रोडवर काही तासांसाठी वाहनांची ये-जा करण्यास बंदी आहे. याशिवाय, वरळी सीफेस, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी ( Girgaon Chowpatty ) जवळील रस्त्यावर तुम्ही वाहने पार्क करू शकणार नाही.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात 11 हजार 500 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात आहेत. 10 हजार पोलिस हवालदार, 1 हजार 500 अधिकारी, 25 पोलिस उपायुक्त, सात अतिरिक्त पोलिस आयुक्त सुरक्षेचा भाग असणार आहेत. आज मुंबई पोलिस प्रमुखांसह कोणत्याही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या सुट्या गद्द करण्यात आल्या आहेत. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी बीच, जुहू बीच, वांद्रे बॅंडस्टँडचा त्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबंस्त आहे. राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पोलीस, क्विक रिस्पॉन्स टीम विविध ठिकाणी तैनात आहेत. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशातील पोलीस कर्मचारी तैनात आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून लोकप्रिय ठिकाणांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.