ETV Bharat / state

बनावट फॉलोअर्स प्रकरणी बॉलिवूड रॅपर बादशहा यास चौकशीसाठी पोलिसांचे समन्स

बनावट फॉलोअर्स प्रकरणी बॉलिवूडमधील रॅपर गायक बादशहा यास चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे.

badshah
badshah
author img

By

Published : Aug 6, 2020, 3:49 PM IST

मुंबई - बॉलिवूड चित्रपट क्षेत्रातील अभिनेत्यांचे सोशल माध्यमांवर बनावट फॉलोअर्स बनविल्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास केला जात आहे. या प्रकरणी बॉलिवूडमधील रॅपर गायक बादशहा यास चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. गुरुवारी (6 ऑगस्ट) बादशहा यास बनावट फॉलोअर्स प्रकरणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण व प्रियांका चोप्रा ह्यांना सुद्धा समन्स बजावले जाणार असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या क्रिमिनल इन्व्हेस्टीगेशन युनिटकडून करण्यात आलेल्या तपासादरम्यान मुंबईतील कुर्ला परिसरातून अभिषेक दौड यास अटक करण्यात आली होती. हा आरोपी बॉलिवूड क्षेत्रातील काही कलाकारांचे सोशल माध्यमांवर लाखोंच्या संख्येने बनावट फॉलोअर्स बनवत होता. पोलिसांच्या अधिक तपासात समोर आले, की या प्रकरणात मोठे आंतराष्ट्रीय रॅकेट काम करीत होता. आता आरोपी हा फ्रान्स स्थित एका वेबसाईटसाठी काम करीत होता. ज्यात या वेबसाईटच्या क्लाईंटच्या सोशल माध्यमांवरील प्रोफाइलसाठी बनावट फॉलोअर्स व लाईक्स निर्माण केले जात होते. अटक आरोपी अभिषेक याने आतापर्यंत 176 आकाउंटसाठी 5 लाखांंहून अधिक बनावट फॉलोअर्स बनविले आहेत.

कसा झाला खुलासा?

बॉलिवूडमधील गायिका भूमी त्रिवेदी हिने सोशल माध्यमांवर तिच्या नावाचा बनावट प्रोफाईल असून त्याचे लाखो फॉलोअर्स असल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली होती. यानंतर अभिनेत्री कोयना मित्रा हिने सुद्धा मुंबई पोलिसांकडे तिच्या बनावट सोशल प्रोफाईलबद्दल तक्रार केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 2 आरोपींंना अटक केली असून भारतात अशा प्रकारचे बनावट फॉलोअर्स व लाईक्स बनविणारे शंभर वेब पोर्टल व 54 विदेशी पोर्टल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष तपास पथक नेमण्यात आले असून या प्रकरणी बॉलिवूड, क्रीडा क्षेत्रातील काही जणांना चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.