मुंबई : मुंबईतील गोरेगावमध्ये पोलिसांच्या गुन्हे शाखेने कॉल सेंटरद्वारे फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बेकायदेशीररित्या कॉल सेंटरवर कारवाई करत क्राईम ब्रांचने मंगळवारी सहा जणांना अटक करण्यात आले (arrested gang of accused) आहे. पोलीसांनी केलेल्या कारवाईत सहा लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केले आहे. या कॉल सेंटरद्वारे आरोपी आर्थिक फसवणूक करत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या टोळीने पीडितांकडून सुमारे ग्राहकांची 4 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा पोलीसांनी आरोप केला (Crime Branch burst illegal call center) आहे.
आमिष दाखवून व्यापार : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Crime Branch Mumbai) सोमवारी रात्री गोरेगाव परिसरातील एसव्ही रोडवरील डीएलएच पार्कमधील कॉल सेंटरच्या कार्यालयावर छापा टाकला, आरोपी 'वन 721 ग्लोबल सर्व्हिस लिमिटेड' नावाचे कॉल सेंटर चालवत होते. मॉरिशस आणि आखाती देशांमध्ये लोकांशी संपर्क साधत होते, त्यांना कमोडिटी ट्रेडिंगमध्ये आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगायचे. आरोपी फॉरेक्स शेअर्स, करन्सी आणि कमोडिटी ट्रेडिंगमधील तज्ञ असल्याचे दाखवून सोशल नेटवर्किंग साइट्सद्वारे ग्राहकांना आमंत्रित करायचे. ग्राहकांना फायद्याचे आमिष दाखवून व्यापार सुरू करण्यासाठी त्यांच्या खात्यात 200 अमेरिकन डॉलर्स जमा करण्यास सांगायचे. असे करता करता आरोपींनी 4 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीसांकडून कारवाईत सहा लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी माहिती दिली (illegal call center in Goregaon) आहे.
अवैध रेती वाहतूक : काल दि. २७ डिसेंबर रोजी एलसीबीचे पथक धारणी डिव्हिजनमध्ये पेट्रोलिंग करत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, खारी फाटा, पातरपुर ते झिल्पी रोडवर अवैध वाहतूक होत आहे. मिळालेल्या माहितीवरून, विना परवाना रेती चोरून वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर सह आरोपी संतोष चुडामन लायसे, वय ३७, रा. कळमखार ता. धारणी जि. अमरावती (ट्रॅक्टर मालक) व शाम सीताराम दारसिंबे, वय २५ वर्ष रा. कळमखार ता. धारणी जि. अमरावती ( ट्रॅक्टर चालक) यांना ताब्यात घेतले (Goregaon Crime) होते.
एकुण जप्त मुद्देमाल : एक फार्मट्रॅक ४५ कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉली सह कींमत अंदाजे पाच लाख रुपये, एक ब्रास रेती कींमत पाच हजार रुपये एकुण जप्त मुद्देमाल ५०५००० रूपयांचा जप्त केला आहे. पोलीस स्टेशन धारणी येथे कारवाई करण्यात आली होती. ही पथक कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक तपन कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली रामेश्वर धोंडगे, दिपक उईके, युवराज मानमोठे, स्वप्नील तंवर, रवींद्र वऱ्हाडे, सागर नाठे, चालक राजेश सरकटे यांनी केली आहे.