मुंबई : महाराष्ट्रात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बऱ्याच राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. आधी सिल्वर ओकवर महाविकास आघाडीची एकता अबाधित ठेवण्यासाठी बैठक पार पडली. त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा यांनी शरद पवार यांची भेट घेत विविध राजकीय विषयांवर चर्चा केली. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. या निकालाचा धडा घेत आता देशातील भाजप विरोधी पक्ष एकजूट व्यायला सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज डी. राजा यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
-
Shri. D. Raja, National Secretary, CPI visited me at my Mumbai residence today. We exchanged views on the recent Karnataka election results and other National issues. pic.twitter.com/Wu5RQOXg8e
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Shri. D. Raja, National Secretary, CPI visited me at my Mumbai residence today. We exchanged views on the recent Karnataka election results and other National issues. pic.twitter.com/Wu5RQOXg8e
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 14, 2023Shri. D. Raja, National Secretary, CPI visited me at my Mumbai residence today. We exchanged views on the recent Karnataka election results and other National issues. pic.twitter.com/Wu5RQOXg8e
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 14, 2023
'भाजप विरोधी पक्षांची मोट बांधणार' : या भेटीबाबत बोलताना डी. राजा म्हणाले की, 'आज शरद पवारांना भेटलो आणि त्यांच्याशी राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. तसेच विविध योजनांची माहिती त्यांना दिली. देशातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करत असतो. भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचे असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. कर्नाटकच्या निकालाने हे दाखवून दिले आहे की भाजपाचा देखील पराभव होऊ शकतो. कर्नाटकमध्ये जसा भाजपचा पराभव झाला तसा लोकसभेच्या निवडणुकीत देखील त्यांचा पराभव केला जाऊ शकतो. आमचा पक्ष देखील तयारीला लागला आहे. म्हणून देशपातळीवर भाजप विरोधात मोट बांधण्याकरिता मी आज शरद पवारांची भेट घेतली'.
सध्याच्या घडीला कर्नाटकने देशाला नवीन संदेश दिला आहे. सर्वान मिळून भारतीय जनता पार्टीला आपली ताकद दाखवली पाहिजे. केंद्रातील भाजपची सत्ता खाली खेचण्यासाठी सर्व छोट्या मोठ्या विरोधी पक्ष्यांनी एकत्र घेऊन लोकांना नवीन पर्याय देण्याचा विश्वास निर्माण करावा लागणार आहे. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
नितीश कुमारांनीही घेतली होती शरद पवारांची भेट : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गेल्या काही दिवसांपासून भाजप विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी मुंबईत भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार देशातील भाजप विरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्यास यशस्वी होऊ शकतील, मात्र या सर्वांचे नेतृत्व कोण करेल, हा मुद्दा कळीचा आहे. त्यामुळे त्यात त्यांना यश येईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :