ETV Bharat / state

मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 81 टक्क्यांवर, शनिवारी दिवसभरात 1 हजार 134 नवे रुग्ण - covid recovery rate in mumabi

सध्या मुंबईत 18 हजार 298 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 81 टक्क्यांवर पोहचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 85 दिवसांवर पोहचला आहे.

mumbai corona
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Aug 23, 2020, 2:07 AM IST

मुंबई - शहरात काल (शनिवार) कोरोनाचे 1 हजार 134 नवे रुग्ण आढळून आले असून 32 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 35 हजार 357 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 7 हजार 385 झाला आहे. मुंबईमधून शनिवारी 1 हजार 101 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 09 हजार 369 वर गेला आहे.

सध्या मुंबईत 18 हजार 298 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 81 टक्क्यांवर पोहचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 85 दिवसांवर पोहचला आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत शनिवारी 32 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 26 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 24 पुरुष तर 8 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून आज 1 हजार 101 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 1 लाख 09 हजार 369 वर पोहचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 35 हजार 357 रुग्ण असून 1 लाख 09 हजार 369 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 7 हजार 385 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 18 हजार 298 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 85 दिवस तर सरासरी दर 0.82 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 608 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 795 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 6 लाख 97 हजार 368 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.