मुंबई: मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. आतापर्यंत मुंबईत कोरोना विषाणूच्या चार लाटा येवून गेल्या आहेत. या दरम्यान पालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबईत किती प्रमाणात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. याचे ५ वेळा सिरो सर्व्हेक्षण केले. आता ६ व्या वेळा महानगरपालिकेचे आरोग्य सेवा कर्मचारी, घन कचरा व्यवस्थापन विभाग कर्मचारी आणि बेस्ट बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक उपक्रम विभाग कर्मचा-यांमध्ये कोविड विरोधात प्रतिकार शक्ती निर्माण करणारी प्रतिपिंडांची पातळी आजमावणे आणि कोव्हीड व कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा अँटीबॉडीजचा होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यात आला.
९९.९ टक्के व्यक्तिंमध्ये अँटीबॉडीज: सर्वेक्षणात टप्पा १ मध्ये सहभागी झालेल्या व्यक्तिंपैकी ९९.९ टक्के व्यक्तिंमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या होत्या. तर ज्यामध्ये सहभागी झालेल्यांनी दोन डोस घेतले होते. त्यांच्या तुलनेत बुस्टर डोस घेतलेल्या व्यक्तिंमध्ये अँटीबॉडीज तुलनेने अधिक आढळले होते. सेरोसर्व्हेचा दुसरा टप्पा ६ महिन्यांनंतर करण्यात आला. यात पहिल्या टप्प्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व व्यक्तिंची पातळी पुन्हा मोजण्यात आली. या दुस-या टप्प्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये ३,०९९ व्यक्ती सहभागी होत्या. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये २,७३३ लोक सहभागी व्यक्तिंचा पाठपुरवठा शक्य झाला, ज्यातील ५० टक्के फ्रंटलाइन कर्मचारी आणि ५० टक्के आरोग्य सेवा कर्मचारी होते.
या वायात अँटीबॉडीज अधिक: या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २,७३३ व्यक्तिंपैकी ५९ टक्के व्यक्ती हे २५ ते ४५ वर्ष वयोगटातील होते, तर ४१ टक्के व्यक्ती हे ४५ ते ६५ वर्ष वयोगटातील होते. ४५ वर्षांहून अधिक वयोगटातील व्यक्तिंची सरासरी अँटीबॉडीज संख्या ही इतर वयोगटातील व्यक्तिंपेक्षा अधिक होती. केवळ १.३ टक्के व्यक्तिच अशा होत्या, ज्यांनी कोविड-१९ प्रतिबंधात्मक लशीचा एकच डोस घेतला होता. तर ५५ टक्के व्यक्तिंनी दोन डोस घेतले होते आणि ४३ टक्के व्यक्तिंनी लसीचा बूस्टर डोस घेतला होता. तसेच केवळ ०.७ टक्के सहभागी व्यक्तिंनी कोविड-१९ लसीचा एकही डोस घेतला नव्हता.
हेही वाचा: Covid Vaccine कोरोना प्रतिबंध लसीच्या हेटरोलॉगस बूस्टर डोसला मान्यता