ETV Bharat / state

NIA Custody : आकिफ नाचणला 24 ऑगस्टपर्यंत तर शामिल नाचणला 23 ऑगस्टपर्यंत एनआयएची कोठडी - NIA custody

दहशतवादी आकिफ नाचण आणि शामिल नाचणला विशेष न्यायालयाने एनआयएची कोठडी सुनावलीय. एनआयएने शुक्रवारी या दोघांना न्यायालयात हजर केलं होतं. इसिस या दहशतवादी संघटनेशी आकिफ नाचण आणि शामिल नाचणचा संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. दहशतवादी प्रशिक्षण देणाऱ्या मॉड्यूल प्रकरणात या दोघांना एनआयएने अटक केलीय.

आकिफ आणि शामिल नाचणला एनआयएची कोठडी
आकिफ आणि शामिल नाचणला एनआयएची कोठडी
author img

By

Published : Aug 19, 2023, 1:19 PM IST

मुंबई : इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी आकिफ नाचण आणि शामिल नाचणला विशेष न्यायालयानं एनआयए कोठडी सुनावलीय. राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्यांना शुक्रवारी एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आकिफ नाचणला 24 ऑगस्ट तर शामिलला 23 ऑगस्टपर्यंत राष्ट्रीय तपास संस्थेच्या कोठडी ठेवण्याचे आदेश दिलेत.

एनआयएचा आरोप : इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरीया या दहशतवादी संघटनेला दहशतवादी पुरवण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देणाऱ्या मॉड्यूलवर महाराष्ट्र एटीएस आणि राष्ट्रीय तपास संस्थेकडून कारवाई केली जातेय. महाराष्ट्र एटीएसने पुणे, विदर्भ, कोकण, ठाणे या भागातून तबिश नासर सिद्दीकी, झुबिर नूर मोहम्मद शेख (अबु नुसैबा), अदनान सरकार, शर्जिल शेख आणि झुल्फिकार अली बारुदवाला यांना मागील आठवड्यात अटक केली होती. अटकेत असलेल्या व्यक्तींवर दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोप ठेवण्यात आलाय. तसेच माहितीच्या आधारे एनआयएने आकिफ नाचणवर आरोप केलाय.

एनआयएची मागणी फेटाळली : दरम्यान अनेक प्रकरणात तांत्रिक सहकार्य करण्यामध्ये आकिफ नाचणने मदत केलीय. परंतु राष्ट्रीय तपास संस्थेने आकिफ नाचणला राजस्थानमधील अल सुफा या प्रकरणात अटक केलीय. यामुळेच त्याचा पूर्व इतिहास पाहता त्याला एनआयएची कोठडी मिळावी, अशी मागणी एनआयएकडून करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने तांत्रिक कारणास्तव ही मागणी फेटाळून लावली होती. परंतु एनआयएच्या वकिलांनी त्यांची बाजू भक्कमपणे मांडल्याने न्यायालयाने एनआयएची मागणी मान्य केली.

काय म्हणाले वकील : राष्ट्रीय तपास संस्थेचे वकील संदीप सदावर्ते यांनी न्यायालयामध्ये दावा मांडला की, आरोपी शामिल नाचणच्या घराच्या झडतीमध्ये अनेक प्रकारचे महत्त्वाचे साहित्य सापडलेले आहे. या साहित्यामध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स संगणक, मोबाईल हँडसेट याचा समावेश आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्यावतीने अधीक्षक प्रवीण इंगवले यांनी देखील न्यायालयासमोर यासंदर्भात बाजू मांडली. राष्ट्रीय तपास संस्था आणि एटीएस यांच्याकडून गंभीरपणे मुद्दा मांडला गेला की "देश विघातक कृत्यात हे आरोपी सामील आहेत. त्यासंदर्भातील तथ्य आणि पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळेच याबाबत बारकाईने तपास करण्याची गरज आहे. अन्यथा अनेक पुरावे हे आरोपी मंडळी नष्ट करू शकतील. त्यामुळेच शामिल नाचणला 23 ऑगस्टपर्यंत तर आकिफ नाचणला 24 ऑगस्टपर्यंत कोठडी न्यायालयाने सुनावलेली आहे. तपास यंत्रणांच्या दृष्टीने शामिल नाचण हा या सर्व आरोपींमधील महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळेच त्याची अधिक तपासणी आणि चौकशी होणे जरुरी आहे.

हेही वाचा-

  1. NIA Raid In Malegaon: एनआयएची मालेगावमध्ये धाड, पीएफआय संघटनेशी संबंधित एका संशयिताला अटक
  2. NIA Wanted Terrorist : NIA ला हवेत हे चार अतिरेकी, खोऱ्यात सर्वत्र लावले पोस्टर्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.