मुंबई - बनावट औषध निर्मितीच्या संदर्भात मुंबई पोलिसांकडून उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान बनावट औषध निर्मिती करणाऱ्या एका फार्मासिटिकल कंपनीला सील करण्यात आलेले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी संदीप मिश्रा या फार्मासिटिकल कंपनीच्या मालकाला अटक केलेली आहे.
अशी करण्यात आली कारवाई
बनावट औषधांच्या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून या अगोदर करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान काही आरोपींची चौकशी करण्यात येत होती. यामध्ये उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे बनावट औषध निर्मितीचा कारखाना कार्यरत असून यासंदर्भात अधिक तपास केला असता मुंबई पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे गेले होते. या प्रकरणात आतापर्यंत मुंबई पोलिसांनी संदीप मिश्रा, सुदीप मुखर्जी या दोन आरोपींना अटक केली आहे. शिवाय बनावट औषध निर्मितीच्या प्रकरणात आणखीन किती जण सामील आहेत, त्यांचा तपास पोलीस करत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मेरठ येथे बनावट औषधी निर्माण करण्याचा कारखाना संदीप मिश्रा या आरोपीच्या मार्फत सुरू होता. या कारखान्यात बनवण्यात आलेले बनावट औषध मुंबईत सुदीप मुखर्जी या उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे राहणाऱ्या आरोपीच्या मार्फत पाठवले जात होते. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून गेल्या काही दिवसांपासून याप्रकरणी तपास सुरू असताना सुरूवातीला सुदीप मुखर्जी याला पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी केली असता संदीप मिश्रा या आरोपीचे नाव समोर आले होते.
हेही वाचा- 'चांग' घर, जे हत्तीच्या हल्ल्यापासून गावकऱ्यांचा बचाव करतं